Weather

Maharashtra Rain: राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाचे सत्र सुरु आहे. या महिन्यातही पावसाचे सत्र सुरूच राहणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. तसेच रब्बी हंगाम सुरु होणार असल्याने शेतकऱ्यांच्या शेत मशागतीच्या कामाला पावसामुळे उशीर होत आहे.

Updated on 04 October, 2022 1:31 PM IST

Maharashtra Rain: राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाचे (Heavy Rain) सत्र सुरु आहे. या महिन्यातही पावसाचे सत्र सुरूच राहणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. तसेच रब्बी हंगाम (Rabi Season) सुरु होणार असल्याने शेतकऱ्यांच्या शेत मशागतीच्या कामाला पावसामुळे उशीर होत आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे परतीच्या पावसाला विलंब होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून (Wheather Department ) वर्तवण्यात आला आहे. तसेच नोरू चक्रीवादळामुळे (Cyclone Noru) देशातील अनेक राज्यात पावसाचा कहर पाहायला मिळणार आहे.

महाराष्ट्रात पावसाळ्यामुळे आतापर्यंत ३४३ जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी २० टक्के लोकांचा मृत्यू केवळ वीज पडून झाला आहे. मध्य आणि उत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात विजांचा कडकडाट झाला आहे.

सांगा शेती करायची कशी! कांद्यापाठोपाठ मुसळधार पावसाने मका पिकाचेही नुकसान; शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी

विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक 192 मृत्यू झाले असून, त्यापैकी नागपूरमध्ये सर्वाधिक 35 मृत्यू झाले आहेत. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत ६१ तर उत्तर महाराष्ट्रात ४१ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, सर्वात कमी मृत्यू कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात झाले आहेत.

सांगा शेती करायची कशी! कांद्यापाठोपाठ मुसळधार पावसाने मका पिकाचेही नुकसान

आज महाराष्ट्रात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे

उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, जळगाव, धुळे, मराठवाड्यातील नांदेड, बीड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद आणि विदर्भातील अमरावती, वाशीम, चंद्रपूर या भागात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच हवामान खात्याने यलो अलर्ट (Yellow Alert) देखील दिला आहे.

महत्वाच्या बातम्या:
गहू लागवडीअगोदर बियाणे दर्जेदार आहे की नाही, अशाप्रकारे चुटकीसरशी ओळखा
हिरवा चारा नाही, नो टेन्शन! हिरव्या चाऱ्याला चांगला पर्याय ठरणार अझोला; दुधाचे उत्पादन वाढणार

English Summary: Maharashtra Rain: Monsoon in Maharashtra! 343 deaths; Heavy rain alert issued today
Published on: 04 October 2022, 01:30 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)