Weather

Maharashtra Rain: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. राज्यातील अनेक भागात काल रात्री मुसळधार पाऊस कोसळल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच आजही भारतीय हवामान खात्याने राज्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

Updated on 18 October, 2022 10:25 AM IST

Maharashtra Rain: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने (Rain) थैमान घातले आहे. राज्यातील अनेक भागात काल रात्री मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच आजही भारतीय हवामान खात्याने (IMD) राज्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

मुंबई, रायगड, पुणे, पालघर, ठाणे यासह राज्यातील अनेक भागात यलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, मुसळधार पावसाचा इशारा असताना राज्यात विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.

पुण्यात मुसळधार पाऊस

पुण्यात (Pune) सोमवारी रात्री मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे रस्ते जलमय झाले. यावेळी वारेही जोरदार वाहत होते. त्यामुळे रस्त्यांच्या कडेला असलेली झाडे उन्मळून पडली. शिवाजी नगर परिसरातही 81 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सिंहगड रोड, एनआयबीएम, बीटी कवडे रोड, हडपसर, मार्केट यार्ड, कात्रज अशा अनेक भागात पाणी साचल्याने नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत.

डीएपी खतांच्या नव्या किमती जाहीर; जाणून घ्या नवीन किमती

वास्तविक, बंगालच्या उपसागरात आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे, त्यामुळे मुंबई आणि उत्तर पश्चिम भारतातील अनेक भागात सतत पाऊस पडत आहे. सखल भागात रस्ते, घरे आणि रुग्णालयेही पाण्याखाली गेली आहेत.

ऑक्टोबरमध्ये रेकॉर्डब्रेक पाऊस

विशेष म्हणजे मुंबईत ऑक्टोबरमध्ये झालेल्या पावसाने हा विक्रम मोडला आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, ऑक्टोबरमध्ये एकाच दिवसात सर्वाधिक 86.5 पावसाची नोंद झाली आहे.

मुसळधार पावसाचे थैमान! ४ हजार कोंबड्या पाण्यात बुडाल्या; महिला शेतकऱ्याने रडत रडत सांगितली आपबीती

रेकॉर्डबद्दल बोलायचे झाले तर, 1988 मध्ये ऑक्टोबरमध्ये एका दिवसात पावसाची नोंद झाली होती, तर 15 ऑक्टोबरला 140.8 मिमी पावसाची नोंद झाली होती. त्याच वेळी, गेल्या आठवड्यात मुंबईत 24 तासांत 114 पावसाची नोंद झाली.

महत्वाच्या बातम्या:
देशात लम्पीचा कहर! ७० हजारांहून अधिक जनावरांचा मृत्यू; जाणून घ्या मृत्यूदर वाढतोय की कमी होतोय...
पीएफ खातेधारकांनो फक्त करा हे काम मिळतील 7 लाख रुपये; जाणून घ्या सविस्तर प्रक्रिया

English Summary: Maharashtra Rain: Heavy rain in Maharashtra! heavy rain fell in many places, warning of heavy rain still today
Published on: 18 October 2022, 10:25 IST