Weather

Maharashtra Rain Alert: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस बरसताना दिसत आहे. तसेच मध्यंतरी कमी झालेल्या पावसाचा जोर महाराष्ट्रात पुन्हा एकदा वाढला आहे. काही भागात मुसळधार पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच महाराष्ट्रातील काही भागात अजूनही समाधानकारक पाऊस पडला नाही. त्यामुळे शेती कामाला सुरुवात झालेली नाही.

Updated on 29 July, 2022 11:06 AM IST

Maharashtra Rain Alert: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मान्सूनचा (Monsoon) पाऊस बरसताना दिसत आहे. तसेच मध्यंतरी कमी झालेल्या पावसाचा (Rain) जोर महाराष्ट्रात पुन्हा एकदा वाढला आहे. काही भागात मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच महाराष्ट्रातील काही भागात अजूनही समाधानकारक पाऊस पडला नाही. त्यामुळे शेती कामाला सुरुवात झालेली नाही.

शेतीचा खरीप हंगाम सुरु झाला आहे. त्यामुळे शेतीकामाला वेग आला आहे. राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात समाधानकारक वातावरण आहे. येत्या काही दिवसात महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याकडून (IMD) देण्यात आला आहे. शुक्रवारीही महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे.

हवामान केंद्र मुंबई (मौसम केंद्र मुंबई) नुसार, संपूर्ण राज्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. भंडारा, गडचिरोली, गोंदिया आणि यवतमाळमध्ये पावसाची शक्यता लक्षात घेऊन हवामान खात्याने यलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे. या ठिकाणांचा इशारा शुक्रवारीही कायम राहणार आहे. दुसरीकडे, महाराष्ट्रातील हवेचा दर्जा निर्देशांक बहुतांश शहरांमध्ये 'चांगल्या ते समाधानकारक' श्रेणीत नोंदवला जात आहे.

7th Pay Commission: खुशखबर! कर्मचाऱ्यांना DA सोबत मिळणार आणखी एक वाढ!

शुक्रवारी महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये हवामान कसे असेल?

पुणे हवामान

पुण्यात कमाल तापमान 31 तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. ढगाळ वातावरण असेल आणि हलक्या पावसाची शक्यता आहे. 'समाधानकारक' श्रेणीत हवेचा दर्जा निर्देशांक 56 वर नोंदवला गेला आहे.

मुंबईच हवामान

शुक्रवारी मुंबईत कमाल तापमान 31 आणि किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. आकाश ढगाळ राहील आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवेचा दर्जा निर्देशांक 'समाधानकारक' श्रेणीत 99 वर नोंदवला गेला.

Business: फक्त 10 हजार रुपयात सुरू करा 'हा' व्यवसाय, वर्षभर होईल कमाई

नागपूर हवामान

नागपुरात कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. ढगाळ वातावरण असेल आणि काही काळ पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. त्याच वेळी, हवा गुणवत्ता निर्देशांक 48 आहे, जो 'चांगल्या' श्रेणीत येतो.

औरंगाबाद हवामान

औरंगाबादमध्ये कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. दुपारी किंवा संध्याकाळी पाऊस किंवा गडगडाट अपेक्षित आहे. हवेचा दर्जा निर्देशांक 'चांगल्या' श्रेणीत 50 आहे.

नाशिक हवामान

नाशिकमध्ये कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. ढगाळ वातावरण असेल आणि हलका पाऊस किंवा रिमझिम पाऊस पडू शकतो. हवेचा दर्जा निर्देशांक 'चांगल्या' श्रेणीत 34 आहे.

महत्वाच्या बातम्या:
शेतकऱ्यांवर पडणार पैशाचा पाऊस! या पिकाची लागवड करा आणि १५० वर्षे कमवा; जाणून घ्या सविस्तर...
शेतकरी होणार मालामाल! हिरव्या मिरचीची लागवड करा आणि लाखों कमवा, करा या पद्धतीचा वापर

English Summary: Maharashtra Heavy rain in these districts, alert issued by IMD
Published on: 29 July 2022, 11:06 IST