राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे.यामुळे राज्यात उन्हाचा पारा वाढला आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश भागात कोरडं हवामान राहण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.तसेच राज्यात पुढील पाच दिवस मुख्यत पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार सध्या महाराष्ट्रात कोरडे हवामान आहे. येत्या दोन दिवसांत राज्यातील कोकण किनारपट्टी, मराठवाडा तसेच विदर्भातील काही भागांमध्ये तुरळक पाऊस होण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे मुंबई, पुणे, ठाण्यात पावसाची शक्यता खुप कमी आहे. महाराष्ट्रात कोरडे हवामान असुन काही भागांमध्ये ढगाळ वातावरण राहील, पण सप्टेंबर महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मागील काही दिवसांच्या जोरदार पावसामुळे राज्यातील धरणातील पाण्याचा साठा बऱ्यापैकी वाढला असुन यामुळे रब्बी हंगामातील पिकांना याचा मोठा फायदा मिळणार आहे.
Published on: 04 October 2023, 05:29 IST