Maharashtra Rain: राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे.
दरम्यान, अशातच आता राज्यात ऐन दिवाळीत पुन्हा एकदा जोरदार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे परतीच्या पावसाचा मुक्काम अजून आठवडाभर लांबला आहे. सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होतोय. त्याची तीव्रता वाढतेय.
अंदमानमधील कमी दाबाच्या क्षेत्रापासून तमिळनाडू, केरळ ते आग्नेय अरबी समुद्रापर्यंत हा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे पुढचे दोन दिवस जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कृषी मंत्र्यांनी शेताच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी; पंचनाम्यानंतर 15 दिवसांत मदत
राज्यात आज (ता.22) कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तसेच मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, मराठवाड्यातील बीड, औरंगाबाद, जिल्ह्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
येणाऱ्या दोन दिवसांत मान्सून राज्यातून काढता पाय घेईल, असा अंदाज आहे. मात्र, या काळात दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्रात तुरळक भागांत पावसाची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रात दोन दिवसात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.
कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, DA वाढीनंतर इतर भत्यातही मोठी वाढ
परतीच्या पावसाने सर्वात जास्त नुकसान शेती पिकाचे झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अस्मानी संकटामुळे गेल्याने ऐन दिवाळीत शेतकरी हवालदिल झाला आहे.
सरकारकडून महागाई भत्त्यात वाढ करून केंद्रीय कर्मचाऱ्यांना दुप्पट बोनस
Published on: 22 October 2022, 05:27 IST