Weather

पोषक वातावरण असल्यामुळे दोन दिवसापासून जलद गतीने प्रवास करत असलेला मान्सून अखेर काल शनिवारी थेट मुंबई ठाणे आणि पुण्या सोबतच कोकणातील बऱ्याच भागांमध्ये आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी येऊन धडकला.

Updated on 12 June, 2022 7:55 AM IST

 पोषक वातावरण असल्यामुळे दोन दिवसापासून जलद गतीने प्रवास करत असलेला मान्सून अखेर काल शनिवारी थेट मुंबई ठाणे आणि पुण्या सोबतच कोकणातील बऱ्याच भागांमध्ये आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी येऊन धडकला.

येणारा 48 तासात त्याच्या प्रवासात आणखी प्रगती होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

मोसमी पाऊस मुंबई परिसरात आणि कोकणात दाखल झाल्यामुळे या परिसरात पावसाने हजेरी लावली असून पुढील दोन दिवस कोकणात मुसळधार पावसाची शक्यता असून उरलेल्या सर्व महाराष्ट्रात येणाऱ्या पाच दिवस हलक्‍या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

जर मान्सूनच्या प्रवासाचा विचार केला तर अरबी समुद्राच्या बाजूने मोसमी पावसाच्या प्रवासाला 9 जून अर्थात  गुरुवार पासून चांगली चालना मिळाली असून पोषक वातावरण तयार झाल्याने दहा जूनला त्याने गोवा पार करून दक्षिण कोकणातुन महाराष्ट्रात प्रवेश केला होता. त्यामुळे पालघर मधील डहाणूपासून मध्य महाराष्ट्रातील पुणे,  कर्नाटक राज्यातील गदग आणि बेंगलोर अशा सध्या मोसमी पावसाची सीमा आहे.

नक्की वाचा:लेझर किरणांचा वापर करून 'हे' यंत्र करेल अगदी कमी खर्चात तुमच्या जमिनीचे सपाटीकरण, वाचा सविस्तर माहिती

 मराठवाड्यातही लवकरच आगमन होण्याची शक्यता

 सध्या मोसमी पावसाच्या प्रवासाला अनुकूल वातावरण असल्यामुळे येणाऱ्या 48 तासांमध्ये तो कोकणातील सर्व भाग व्यापून थेट गुजरात पर्यंत मजल मारणार आहे.

तसेच दक्षिणेकडील राज्यांचा विचार केला तर या भागात देखील मान्सूनचा विस्तार होणार असल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले असून त्याचप्रमाणे पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये मराठवाड्याच्या काही भागात मोसमी पाऊस सक्रिय होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.

तसेच राज्याच्या परभणी, अकोला, चंद्रपूर  इत्यादी ठिकाणी चांगला पाऊस झाला. शेतात काम करत असताना वादळी वाऱ्यासह वीज पडून एका 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील दिंदोडा शेतशिवारात घडली असून काल दुपारच्या दरम्यान वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. त्यासोबतच बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा परिसरात  काल सायंकाळी झालेल्या पहिल्याच मुसळधार पावसाने सोनाळा नदीला पूर आल्याने या पुरात काही शेळ्या वाहून गेल्या.

नक्की वाचा:Mansoon News: येत्या दोन दिवसात मान्सून संपूर्ण राज्याच्या भेटीला, महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना येलो ॲलर्ट

 तसेच या पावसाने यवतमाळ जिल्ह्यात देखील जोरदार हजेरी लावल्याने उमरखेड तालुक्यातील नारळी गावामध्ये  वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने या गावातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून इलेक्ट्रिक पोल बऱ्याच प्रमाणात पडले. 

इतकेच नाही तर ब-याच नागरिकांच्या घरावरील पत्रे उडाले. यासोबतच अहमदनगर शहरासह तालुक्यात देखील अनेक ठिकाणी चांगल्या पावसाने हजेरी लावली. वाशिम जिल्ह्यातील आडोळी गाव परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्याने नदी-नाल्यांना पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचे बांध फुटल्याने शेताबाहेर पाणी वाहत होते. अकोला जिल्ह्यात देखील जोरदार पावसाने हजेरी लावली असून या पावसात दक्षिण-मध्य रेल्वेच्या शिवापूर स्थानकावर लाख रुपयांचा सिमेंट आणि खताची पोती भिजल्यामुळे

नक्की वाचा:केंद्रीय समितीची पीक विविधतेची शिफारस! शेतकऱ्यांनी गहू आणि धानाऐवजी तेलबिया पिकांची लागवड करण्यावर भर द्यावा

English Summary: in will be coming five day mansoon rain entered in whole maharashtra
Published on: 12 June 2022, 07:55 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)