राज्यामध्ये मान्सूनचे आगमन झाले असून दक्षिण कोकणात मान्सून जोरदार एण्ट्री केली असून कोकणातील बहुतांश भागात मान्सूनला सुरुवात झाली असून राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाने चांगलेच झोडपले.
सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पुणे, सातारा आणि मुंबईला काल पावसाने हजेरी लावल्यामुळे असह्य उकाडा यामुळे त्रस्त झालेल्या जनतेला थोडाफार दिलासा मिळाला आहे.
महत्त्वाचे म्हणजे या दरम्यान मान्सूनची वाटचाल योग्य दिशेने सुरू असल्यामुळे येत्या दोन दिवसात संपूर्ण राज्यात पावसाची शक्यता आहे. जर यामध्ये आपण मध्य महाराष्ट्राचा विचार केला तर नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक त्यासोबतच सातारा, सांगली, कोल्हापूर तसेच मराठवाडा विभागातील हिंगोली, नांदेड, बीड, परभणी
आणि औरंगाबाद इत्यादी जिल्ह्यांमध्ये आणि विदर्भामध्ये अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपुर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो ॲलर्ट देण्यात आला आहे. तसेच राज्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली असून तळकोकणामध्ये मान्सून दाखल झाला असून दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात आजपासून जोरदार पावसाची शक्यता आहे.
तसेच उर्वरित महाराष्ट्रात बऱ्याच भागांमध्ये वादळी वारे,मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.तसेच मराठवाडा,मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातजोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
मान्सून उत्तर प्रदेश पासून आसामच्या पश्चिमे पर्यंत हवेचा पूर्व-पश्चिम कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पाऊस होणार आहे. मध्यप्रदेश पासून आंध्रच्या किनारपट्टीवर पर्यंत आणखी एक कमी दाबाचा पट्टा आहे.
कोकण किनारपट्टीलगत अरबी समुद्र सपाटीपासून 5.8 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे.राज्याच्या अनेक भागात पूर्व मोसमी पावसाला पोषक हवामानात मेघगर्जना,वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे.पावसाचे वातावरण ढगाळ वातावरण यामुळे राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार होत असून विदर्भामध्ये असलेली उष्णतेची लाट आता कमी झाली आहे परंतु उन्हाचा चटका जाणवत आहे.
नक्की वाचा:Mansoon: येरे येरे पावसा! 'या' दिवशी मान्सूनचे आगमन होणार, हवामान विभागाची माहिती
Published on: 11 June 2022, 10:54 IST