Weather

IMD Rain Alert: परतीच्या पावसाचा राज्यभर धुमाकूळ पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी विश्रांती दिल्यानंतर पुन्हा एकदा मुसळधार बरसायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस पडत असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच पुढील ३ दिवस आणखी मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

Updated on 13 October, 2022 10:16 AM IST

IMD Rain Alert: परतीच्या पावसाचा (Rain) राज्यभर धुमाकूळ पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी विश्रांती दिल्यानंतर पुन्हा एकदा मुसळधार बरसायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस पडत असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच पुढील ३ दिवस आणखी मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, उत्तर अंदमान समुद्रात खालच्या उष्णकटिबंधीय स्तरावर चक्रीवादळाचे परिवलन कायम आहे आणि पुढील 3-4 दिवसांत ते पश्चिमेकडे सरकण्याची दाट शक्यता आहे. परिणामी ईशान्य, पश्चिम बंगाल, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये येत्या काही दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.

IMD नुसार आजही अनेक राज्यांमध्ये पाऊस सुरूच राहणार आहे. पुढील 4-5 दिवसांत वायव्य आणि मध्य भारतातील आणखी काही भागांतून नैऋत्य मान्सून (Southwest Monsoon) माघारीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.

अवकाळी पावसाचा खरीप पिकांना फटका! सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान तरीही भाव का होतायेत कमी?

आज, भारतातील अर्ध्याहून अधिक राज्यांमध्ये पावसासाठी येलो अलर्टचा (yellow alert) इशारा देण्यात आला आहे. 15 ऑक्टोबरनंतर पावसाळा थांबू शकतो, असे मानले जात आहे.

आज पश्चिम बंगाल, झारखंड, अरुणाचल प्रदेश, दक्षिण-पूर्व मध्य प्रदेश, विदर्भ, मराठवाडा आणि महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये हलका ते जोरदार पावसाची शक्यता आहे.

स्कायमेट वेदर या खाजगी हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या एजन्सीनुसार, कर्नाटक, महाराष्ट्र (Maharashtra), छत्तीसगडमध्ये पाऊस पडू शकतो. तसेच पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिशा, तेलंगणा, तामिळनाडू आणि ईशान्य भारतात पाऊस पडू शकतो.

पावसामुळे पिके उध्वस्त झाली, नो टेन्शन! शेतकऱ्यांनो लगेच करा हे काम; मिळेल नुकसान भरपाई

बिहार, ओडिशा, पूर्व मध्य प्रदेश, अंदमान आणि निकोबार बेटे, तामिळनाडू, केरळ, लक्षद्वीप आणि सिक्कीमच्या काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्येही पावसाची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या:
कच्चे तेल उच्चांकापेक्षा 34% स्वस्त; जाणून घ्या पेट्रोल डिझेलच्या दरात काय झाला बदल
कर्मचाऱ्यांची लॉटरी! DA वाढीनंतर केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना दिली आणखी एक मोठी भेट

English Summary: IMD Rain Alert: Next 3 days of rain! Many states including Maharashtra will be hit by heavy rains
Published on: 13 October 2022, 10:16 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)