Weather

IMD Rain Alert: यंदाचा मान्सून वेळेवर देशात आणि राज्यात दाखल झाल्याने नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. मात्र आता राज्यात काही भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. परतीच्या पावसाला पोषक हवामान तयार झाल्याने लवकरच परतीच्या पावसाला सुरुवात होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Updated on 22 September, 2022 10:18 AM IST

IMD Rain Alert: यंदाचा मान्सून (Monsoon) वेळेवर देशात आणि राज्यात दाखल झाल्याने नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. मात्र आता राज्यात काही भागात मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. परतीच्या पावसाला पोषक हवामान तयार झाल्याने लवकरच परतीच्या पावसाला सुरुवात होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

भारतीय हवामान विभागाकडून (IMD) राज्यात पुन्हा काही भागांत मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 5 ते 10 ऑक्टोबर दरम्यान मुंबई शहर आणि महाराष्ट्रातील (Maharashtra) काही भागांत पुन्हा मुसळधार पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे.

मुंबईत बुधवारीही दुपारनंतर पावसाने हजेरी लावली. त्याचवेळी पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचले होते, त्यामुळे नागरिकांना काहीसा त्रास सहन करावा लागला. त्याचवेळी, हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, आजही महानगरात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मान्सूनच्या सुरुवातीला विदर्भ आणि मराठवाड्याला पावसाने झोडपून काढले होते. त्यामुळे तेथील खरीप पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. मात्र आता पुन्हा एकदा पाऊस पडला तर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.

विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला हवामान विभागाकडून यलो अलर्ट (Yellow Alert) देण्यात आला आहे. तसेच शेतकऱ्यांनी खरीप पिकांची काढणी केली असेल तर ते सुरक्षित ठिकाणी त्याची साठवणूक करण्याचा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात आला आहे.

पीएम किसान योजनेचा 12 वा हप्ता कधीही होऊ शकतो शेतकऱ्यांच्या खात्यात जमा; असे तपासा यादीत नाव

यलो अलर्ट म्हणजे नेमकं काय?

यलो अलर्ट म्हणजे नेमकं काय असा प्रश्न सगळ्यांना पडला असेल. तर या यलो अलर्टमध्ये हवामान खात्यानं हलक्या पावसाची शक्यता वर्तवलेली असते. तसेच यलो अलर्ट हा सावध राहण्यासाठी दिला जातो. हा इशारा वॉचसाठी दिलेला असतो.

जेव्हा हवामानात बदल होतो तेव्हा हा अलर्ट दिला जातो. तुम्‍हाला तत्‍काळ धोका नाही. परंतु, हवामानाची स्थिती पाहता, तुम्‍ही ठिकाण आणि तुमच्‍या प्रवासाची काळजी घेतली पाहिजे, असे या अलर्टचा अर्थ आहे.

महाराष्ट्रातील शेतकऱ्याचा YouTube वर जलवा! शेतीचे व्हिडिओ बनवून कमवतोय बक्कळ पैसा

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत गुरुवारी, 22 सप्टेंबर रोजी दिवसभर आकाश ढगाळ राहील आणि यादरम्यान शहरात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, उद्या म्हणजेच 23 सप्टेंबर रोजीही मुंबईत ढगाळ आकाशासह मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

यानंतर 24 सप्टेंबर रोजी शहरात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर 25 आणि 26 सप्टेंबर रोजी शहरात पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मुंबईत आज किमान तापमान २५ अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या:
खुशखबर! पेट्रोल-डिझेल 11 रुपयांनी स्वस्त होणार; जाणून नवीनतम दर...
मेष, तूळ, धनु आणि मकर राशीच्या लोकांनी करू नका हे काम; अन्यथा होईल मोठे नुकसान

English Summary: IMD Rain Alert: Less rain in the state! However, torrential rains will fall in some areas (1)
Published on: 22 September 2022, 10:18 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)