IMD Rain Alert: देशात गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाचा (Rain) धुमाकूळ पाहायला मिळत आहे. हवामानात बदल झाल्यामुळे परतीचा पाऊस आणखी लांबण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत आहे. मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) महाराष्ट्रातील शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
दरम्यान, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याचे दिसून येत असून, या आठवड्याच्या अखेरीस त्याचे चक्रीवादळात (Cyclone) रूपांतर होऊ शकते. हवामान खात्यानुसार, येत्या २४ ते ३६ तासांत बंगालच्या उपसागराच्या नैऋत्य आणि लगतच्या पूर्व-मध्य भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे.
22 ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत ते पश्चिम-वायव्य दिशेने सरकण्याची आणि बंगालच्या उपसागराच्या मध्यभागी दाबाचे क्षेत्र बनण्याची दाट शक्यता आहे. चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता, ओडिशा सरकारने 23 ते 25 ऑक्टोबरपर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द केल्या आहेत.
Tomato price: टोमॅटो उत्पादकांना दिलासा! टोमॅटोचे भाव 60 रुपयांच्या पार
राज्याने किनारपट्टीवरील जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मच्छिमारांना पश्चिम-मध्य आणि लगतच्या उत्तर-पश्चिम बंगालच्या उपसागरात जाऊ नये, असा सल्ला देण्यात आला आहे. हवामान खात्यानुसार चक्रीवादळाच्या वेळी वाऱ्याचा वेग 45 ते 55 किमी प्रतितास असू शकतो.
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, या चक्रीवादळाच्या निर्मितीनंतर बंगालला लागून असलेल्या झारखंड, बिहार ते ओडिशा या राज्यांपासून हवामानात बदल होऊ शकतो आणि अनेक भागात जोरदार वाऱ्यासह पाऊस पडू शकतो.
महाराष्ट्र (Maharashtra), कर्नाटक, तामिळनाडू, पुद्दुचेरी, केरळ, अंदमान-निकोबार बेटे, लक्षद्वीप, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये २१ ऑक्टोबरपर्यंत पावसाचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.
कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, DA नंतर आता प्रवास भत्ताही वाढवला
यासोबतच केरळ, तामिळनाडू, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या काही भागात 22 ते 25 ऑक्टोबर दरम्यान पाऊस पडू शकतो, असे हवामान खात्याचे म्हणणे आहे.
स्कायमेट वेदर (Skymet Weather) या खाजगी हवामान अंदाज संस्थेच्या म्हणण्यानुसार लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार बेटांवर आणि कर्नाटकच्या अंतर्गत भागात हलका ते जोरदार पाऊस पडू शकतो. तर विदर्भ, मध्य महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे.
दुसरीकडे, गिलगिट-बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, लडाख, जम्मू आणि काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तराखंडमध्ये एक किंवा दोन ठिकाणी हलका पाऊस आणि बर्फवृष्टी होऊ शकते. नागालँड, मणिपूर, मिझोराम, ओडिशा, छत्तीसगड आणि विदर्भात हलक्या पावसाची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या:
तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर! पंपावर जाण्यापूर्वी जाणून घ्या नवीनतम दर...
EPF ट्रान्सफर प्रक्रिया आणखी झाली सोपी, आता तुम्हाला फॉर्म-13 भरावा लागणार नाही; जाणून घ्या प्रक्रिया...
Published on: 20 October 2022, 10:02 IST