Mumbai : काही दिवसांपूर्वी भारतीय हवामान विभागाने (IMD) मान्सून अंदमान आणि निकोबारच्या बेटांवर दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. आणि अगदी सहा दिवस आधीच मान्सून अंदमानात दाखल झाला. त्यामुळे आता महाराष्ट्रातही मान्सून लवकरच दाखल होऊ शकतो असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.
राज्यातील बदलते वातावरण बघता पुढील तीन ते चार दिवसांत राज्यातील काही भागात जोरदार पाऊस (Rain) पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे राज्यात 21 मे पर्यंत कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसाचे आगमन होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी पावसाचे आगमन होणार आहे तर काही ठिकाणी उष्णतेची लाट येणार असल्याचं वर्तवलं जात आहे.
विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत उष्णतेची लाट येणार आहे. हवामान विभागाने यावेळेस देखील वेळेआधीच पावसाचे आगमन होण्याची शक्यता वर्तवली होती. साधारणपणे केरळमध्ये मान्सून (Monsoon) हा 1 जून रोजी दाखल होतो. मात्र, यंदा मान्सूनचं 27 मे रोजीच आगमन होणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली होती. मात्र, आता पुढील काही दिवसातच केरळमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली.
LPG Price Hike : आता सर्वसामान्यांनी जगायचे कसे..! गॅस सिलेंडर झाला हजाराच्या पार
बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या वाऱ्यांमुळे सध्या राज्यातल्या अनेक भागात पूर्वमोसमी पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यात पुढील ४ दिवस पाऊस बरसणार आहे. त्यातल्या त्यात कोकण किनारपट्टीवर पुढील चार दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे.
Electricity Bill: या महावितरणाचे करायचे तरी काय! ना खांब, ना कनेक्शन तरी आले एक लाखाचे बिल
बुधवारी सातारा, सांगली, कोल्हापूर व उस्मानाबाद जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने चांगलीच हजेरी लावली. तर गुरूवारी लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, उस्मानाबाद, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचे आगमन होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे सध्या राज्यात हवामानात कमालीचा बदल बघायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या:
महाराष्ट्र सरकार जागतिक बँकेच्या भागीदारीतून सुरू करणार स्मार्ट प्रकल्प
Published on: 19 May 2022, 12:04 IST