Weather

IMD : महाराष्ट्रात आज तापमान साधारण राहणार असलं तरी 17 मे पासून मात्र वाढणाऱ्या उष्णतेमुळे हालहाल होण्याची शक्यता आहे, हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे.मोचा चक्रीवादळाचा मोठा परिणाम महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. पाऊस जरी गेला असला तरी वाढत्या उष्णतेनं हालहाल होत आहे.

Updated on 16 May, 2023 11:31 AM IST

IMD : महाराष्ट्रात आज तापमान साधारण राहणार असलं तरी 17 मे पासून मात्र वाढणाऱ्या उष्णतेमुळे हालहाल होण्याची शक्यता आहे, हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे.मोचा चक्रीवादळाचा मोठा परिणाम महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. पाऊस जरी गेला असला तरी वाढत्या उष्णतेनं हालहाल होत आहे.

17 मे पासून राज्यात पुन्हा एकदा उष्णता वाढणार असून हवामान विभागाकडून अलर्ट देण्यात आला आहे. मोचा चक्रीवादळ म्यांमारच्या उत्तर-पश्चिमी किनाऱ्यावर धडकलं असून त्यामुळे मान्सूनच्या वाटेत अडथळा निर्माण झाला आहे. मान्सून उशिरा येऊ शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

15 मे पासून विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णता वाढत असून दोन जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला होता. IMD ने राज्यभरात उष्णतेच्या लाटेबाबत अलर्ट जारी केला आहे. आयएमडीच्या प्रादेशिक हवामान विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, बुधवार, 17 मे पासून महाराष्ट्रातील अनेक भागात तापमान 2-3 अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे.

नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी. कामाशिवाय घराबाहेर दुपारच्या वेळी पडू नये, बाहेर जाताना छत्री स्कार्फचा वापर करावा असंही यावेळी सांगण्यात आलं आहे. राज्यात काही ठिकाणी पुन्हा उन्हाचा 40 अंशापेक्षा जास्त तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

शिंदे सरकारकडून पंढरपूर आषाढी यात्रेसंदर्भात महत्त्वाचा निर्णय...

English Summary: IMD : Heat wave alert from Meteorological Department
Published on: 16 May 2023, 11:31 IST