Weather

IMD Alert: देशातील मान्सून निघून गेला असला तरी भारतीय हवामान खात्याकडून पुन्हा एकदा देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच आता हळूहळू थंडी देखील वाढू लागली आहे. हवामानात बदल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Updated on 29 October, 2022 9:35 AM IST

IMD Rain Alert: देशातील मान्सून (Monsoon) निघून गेला असला तरी भारतीय हवामान खात्याकडून (IMD) पुन्हा एकदा देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाचा (Rain) इशारा देण्यात आला आहे. तसेच आता हळूहळू थंडी देखील वाढू लागली आहे. हवामानात बदल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडसह उत्तर भारतातील अनेक भागात थंडीने हळूहळू दार ठोठावण्यास सुरुवात केली आहे. सकाळ आणि संध्याकाळी तापमानात घट झाली आहे. या राज्यांतील उंच पर्वतांवर बर्फवृष्टी होत आहे.

सध्या या राज्यांमध्ये हवामानाचा तिहेरी हल्ला पाहायला मिळत आहे. या राज्यांमध्ये थंडी, बर्फवृष्टी आणि पावसामुळे लोकांच्या अडचणी वाढणार आहेत. वास्तविक, वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे डोंगराळ राज्यांतील हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 31 ऑक्टोबर आणि 1 नोव्हेंबरला जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट-बाल्टिस्तान, हिमाचल प्रदेशमध्ये पाऊस पडेल.

धक्कादायक! राज्यातील 3 हजार गावांमध्ये लंपी विषाणूचा फैलाव, एक लाखांहून अधिक जनावरे संक्रमित; हजारोंचा मृत्यू

आज इथे पाऊस पडेल

त्याचवेळी देशातील अनेक राज्यांतून मान्सून निघून गेल्यानंतरही दक्षिण आणि पूर्वेकडील अनेक भागात पाऊस सुरूच आहे. हवामान खात्याने (IMD) आजही अनेक भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे.

IMD च्या अंदाजानुसार, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, अंदमान, निकोबार, यानाम, केरळ आणि माहेसह अनेक ठिकाणी पाऊस चार दिवस सुरू राहण्याची शक्यता आहे. यासोबतच आसाम, अरुणाचल प्रदेश आणि नागालँडमध्ये आज पावसाची शक्यता आहे.

सोने खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी! 10 ग्रॅम सोने 5421 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या नवीनतम दर...

वास्तविक, बंगालच्या उपसागरात सीतरंग चक्रीवादळ (Cyclone Sitarang) तयार झाल्यामुळे बंगालच्या उपसागरावर आणि दक्षिण द्वीपकल्पीय भारतावर उत्तर-पूर्वेकडून वारे वाहण्याची शक्यता आहे. यामुळे, आज 29 ऑक्टोबरच्या सुमारास दक्षिणपूर्व द्वीपकल्पीय भारतात ईशान्य मोसमी पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.

स्कायमेट वेदर (Skymet Weather) या खासगी हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या संस्थेच्या म्हणण्यानुसार, आज अंदमान आणि निकोबार बेटांवर पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासोबतच तामिळनाडूच्या किनारी भागातही पाऊस पडू शकतो. दुसरीकडे, अंतर्गत तामिळनाडू आणि दक्षिण केरळमध्ये पावसाची शक्यता आहे.

दिल्ली आणि NCR वर हलके उत्तर-पश्चिम कोरडे वारे सुरू राहतील. त्यामुळे प्रदूषकांचे वितरण कमी होईल. दिल्ली आणि एनसीआरचा हवा गुणवत्ता निर्देशांक अत्यंत खराब श्रेणीत राहील.

महत्वाच्या बातम्या:
कांदा उत्पादकांसाठी खुशखबर! कांद्याच्या भावात सुधारणा; जाणून घ्या कुठे किती मिळतोय दर...
कच्च्या तेलाच्या किमती घटल्या! जाणून घ्या पेट्रोल डिझेलच्या दरात काय झाला बदल?

English Summary: IMD Alert: Rain alert again! More than 10 states of the country will receive rain; Know the weather forecast
Published on: 29 October 2022, 09:35 IST