Weather

IMD Alert: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाचे सत्र सुरूच आहे. मान्सूनचा दुसऱ्या टप्प्यातील प्रवास सुरु झाला आहे. पावसाच्या सतत कोसळधारा सुरु असल्यामुळे राज्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. तर काही ठिकाणी शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. येत्या तीन चार दिवसांत आणखी जोरदार पाऊस पडणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

Updated on 19 August, 2022 11:11 AM IST

IMD Alert: महाराष्ट्रात (Maharashtra) गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाचे (Heavy Rain) सत्र सुरूच आहे. मान्सूनचा दुसऱ्या टप्प्यातील प्रवास सुरु झाला आहे. पावसाच्या सतत कोसळधारा सुरु असल्यामुळे राज्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. तर काही ठिकाणी शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. येत्या तीन चार दिवसांत आणखी जोरदार पाऊस पडणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

19 ऑगस्ट रोजी अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ, नांदेड, हिंगोली आणि परभणी येथेही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

त्यानंतर 20 ऑगस्ट रोजी अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी, रायगड आणि रत्नागिरी येथेही यलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. तत्पूर्वी बुधवार-गुरुवारीही महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम आहे. संततधार पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे.

Petrol Diesel Price: पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे दर जाहीर! SMS द्वारे जाणून घ्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती...

त्याचवेळी राज्यात 1 जूनपासून अतिवृष्टी आणि पुरासारख्या घटनांमध्ये अनेकांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, महाराष्ट्रातील हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक बहुतांश शहरांमध्ये 'चांगल्या ते समाधानकारक' श्रेणीत नोंदवला गेला.

Mushroom Farming: धिंगरी मशरूम लागवडीतून फक्त 2 महिन्यात कमवा बक्कळ पैसा; अशी करा लागवड

येत्या काही दिवसांत भारतीय हवामान खात्याकडून (IMD) मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा (Warning alert) देण्यात आला आहे. तसेच शेतकऱ्यांसाठीही कृषी सल्ला (Agricultural Consultancy) जारी करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या:
किसान क्रेडिट कार्डचा रेकॉर्डब्रेक शेतकऱ्यांनी घेतला लाभ; आहेत फायदेच फायदे...
दुग्धउत्पादनात होणार भरघोस वाढ! या हिरव्या चाऱ्याने जनावरांच्या दुधात होतेय वाढ; जाणून घ्या...

English Summary: IMD Alert: Heavy rains warning in 'districts' till August 20
Published on: 19 August 2022, 11:11 IST