Weather

राज्यात गेल्या तीन चार दिवसापासून पावसाचा (Rain) जोर चांगलाच वाढला आहे. राज्यातील काही भागात अक्षरश्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. सध्या घाटमाथ्यावरील जोरदार पावसाने नद्या नाले ओसंडून वाहत असताना पाहायला मिळत आहे.

Updated on 13 July, 2022 9:50 AM IST

राज्यात गेल्या तीन चार दिवसापासून पावसाचा (Rain) जोर चांगलाच वाढला आहे. राज्यातील काही भागात अक्षरश्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. सध्या घाटमाथ्यावरील जोरदार पावसाने नद्या नाले ओसंडून वाहत असताना पाहायला मिळत आहे. दरम्यान आज (ता.१३) रोजी पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. असा अंदाज हवामान विभागाने (Meteorological Department) पावसाचा वर्तविला आहे.

राज्यभरात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नदी, नाल्यांना पूर आला आहे. नाशिक, पुणे, कोल्हापूर, पालघर, आणि रत्नागिरी या जिल्ह्यांनाही अलर्ट जारी करण्यात आला आहे. 14 जुलैपर्यंत या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे, अशी माहिती आयएमडीने दिली आहे. मुंबईमध्येही पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस कायम राहील.

हे ही वाचा: रेशन कार्ड धारकांसाठी केंद्र सरकारने केली मोठी घोषणा; लाभार्थ्यांना होणार फायदाच फायदा..

या भागात जोरदार पावसाची शक्यता

आज (ता.१३) रोजी कोकणातील पालघर, रायगड, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील नाशिक पुणे, कोल्हापूर जिल्ह्यांचा घाटमाथा, पूर्व विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात अतिजोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

हे ही वाचा: Village Business Ideas: गावात व्यवसाय सुरू करण्यासाठी 20 कल्पना; भरपूर नफा मिळणार..

मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, सातारा, औरंगाबाद, जालना, चंद्रपूर या जिल्ह्यांतही दमदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे (ऑरेंज अलर्ट). विदर्भासह राज्याच्या बहुतांश भागात काही तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

हे ही वाचा: कांदा उत्पादकांसाठी अच्छे दिन, केंद्र सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय

English Summary: IMD Alert: Heavy rains in the state! Red alert issued by Meteorological Department
Published on: 13 July 2022, 09:50 IST