Weather

भारतातील अनेक राज्यांमध्ये मान्सूनचा (Mansoon) प्रवेश 3 दिवसांपूर्वीच झाला आहे. मान्सूनचे (Mansoon Rain) यावर्षी लवकर आगमन झाले असून आता मान्सून हळूहळू पुढे सरसावत आहे. यामुळे देशातील उष्णतेने हैराण झालेल्या जनतेने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

Updated on 01 June, 2022 12:40 PM IST

भारतातील अनेक राज्यांमध्ये मान्सूनचा (Mansoon) प्रवेश 3 दिवसांपूर्वीच झाला आहे. मान्सूनचे (Mansoon Rain) यावर्षी लवकर आगमन झाले असून आता मान्सून हळूहळू पुढे सरसावत आहे. यामुळे देशातील उष्णतेने हैराण झालेल्या जनतेने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

दरम्यान मान्सूनपूर्व पावसाला (Pre-Mansoon Rain) आपल्या राज्यातही (Maharashtra Rain) सुरुवात झाली आहे. यामुळे राज्यातील उकाड्याने हैराण झालेल्या जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.

हवामान खात्याचे (IMD) म्हणणे आहे की, येत्या काही दिवसांत बिहार, झारखंड आणि छत्तीसगडमध्येही मान्सूनच्या सरी बरसतील. मात्र असे असले तरी याआधीही भारतातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. आपल्या राज्यातील मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात इतर दोन दिवसांपूर्वी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी बघायला मिळाली.

या राज्यांमध्ये पाऊस पडेल

हवामान खात्याच्या (Indian Meteorological Department) ताज्या अहवालानुसार, आज उत्तर पूर्व आणि दिल्लीच्या अनेक भागात पाऊस (Rain) पडण्याची शक्यता आहे. याशिवाय मेघालयमध्ये (Meghalaya) गुरुवार, 2 जूनपासून पावसामुळे तापमानात (Temperature) घट होऊ शकते.

यासोबतच मिझोराम, त्रिपुरा आणि अरुणाचल प्रदेशमध्ये 2 जून ते 4 जून या कालावधीत मुसळधार पावसाची शक्यता आहे. बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये येत्या काही दिवसांत जोरदार वाऱ्यासह पाऊस पडू शकतो, असेही आयएमडीचे म्हणणे आहे. महाराष्ट्र मध्ये देखील मान्सूनपूर्व पावसाचे वातावरण कायम राहणार असून दक्षिण मध्य महाराष्ट्र दक्षिण मध्ये कोकण आणि विदर्भात मान्सूनपूर्व पाऊस बघायला मिळणार आहे.

भारतातील इतर राज्यातील हवामान

मान्सूनच्या आगमनाने देशातील अनेक राज्यांमध्ये वातावरण आल्हाददायक बनले आहे. त्यामुळे अनेक दिवस आकाश ढगाळ राहील. हवामान खात्याच्या ताज्या अपडेटनुसार, आज अहमदाबादमध्ये किमान तापमान 28 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 43 अंश सेल्सिअसपर्यंत राहू शकते.

याशिवाय, श्रीनगर, भोपाळ, चंदीगड, डेहराडून, जयपूर, शिमला, मुंबई, लखनौ, गाझियाबाद, लेह आणि पाटणा येथे किमान तापमान 24 अंश सेल्सिअस ते 42 अंश सेल्सिअस राहील. यापैकी अनेक राज्यांमध्ये आकाश निरभ्र राहील आणि अनेक राज्यांमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता असल्याचेही हवामान खात्याचे म्हणणे आहे.

English Summary: IMD Alert: Heavy rain warning in many parts of the country from today till June 4; Read about it
Published on: 01 June 2022, 12:38 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)