Weather

IMD Alert: देशात गेल्या काही दिवसांपासून मान्सून धुमाकूळ घालत आहे. देशातील काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर अजूनही काही ठिकाणी मान्सून पोहोचला नसल्यामुळे नागरिक पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. येत्या काही तासात अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. तसेच IMD कडून अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे.

Updated on 23 July, 2022 10:39 AM IST

IMD Alert: देशात गेल्या काही दिवसांपासून मान्सून (Monsoon) धुमाकूळ घालत आहे. देशातील काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर अजूनही काही ठिकाणी मान्सून पोहोचला नसल्यामुळे नागरिक पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. येत्या काही तासात अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा (Heavy Rain) इशारा हवामान खात्याकडून (Weather Department) देण्यात आला आहे. तसेच IMD कडून अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे.

देशातील अनेक भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने रेड अलर्ट (Red Alert) जारी केला आहे, कुठे ऑरेंज तर कुठे यलो अलर्ट देण्यात आला आहे. हवामान खात्याने गुजरात, महाराष्ट्र (Maharashtra), राजस्थान, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच नागरिकांना सतर्क राहण्याचेही आव्हान करण्यात आले आहे.

मुसळधार पावसाच्या इशाऱ्यानंतर प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या पथकांना कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोणतीही जीवितहानी होऊ नये यासाठी पूर्णपणे खबरदारी घेण्यात येणार आहे.

वाह क्या बात है! फक्त 15 हजार गुंतवले आणि 15 लाख कमावतोय हा शेतकरी; मुख्यमंत्र्यांकडूनही गौरव

या राज्यांना अलर्ट जारी

23 जुलैपासून चार दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उद्या मुंबई कोकण नाशिक मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गुजरातमध्ये 23 ते 25 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) 23 जुलै रोजी कच्छ, मेहसाणा, साबरकांठा आणि अरवलीसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.

23 जुलैपर्यंत उत्तर प्रदेशात मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आठ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुढील तीन दिवस उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. उत्तराखंडच्या उत्तरकाशी, रुद्रप्रयाग, चमोली, बागेश्वर, नैनिताल आणि पिथौरागढमध्ये २३ जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राजस्थान

दोन नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या सक्रियतेमुळे राजस्थानमध्ये पुढील तीन ते चार दिवस मान्सून जोरदार राहण्याचा अंदाज आहे, राजस्थानच्या अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रविवारी राज्याच्या अनेक भागांत मान्सून सक्रिय राहणार आहे. केंद्राने येत्या २४ तासांत राज्यातील गंगानगर आणि हनुमानगड जिल्ह्यात मुसळधार ते अतिवृष्टीचा 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे. यासोबतच जोधपूर, जयपूर आणि कोटा विभागात काही ठिकाणी मुसळधार आणि अतिवृष्टीची शक्यता आहे.

7th Pay Commission: खुशखबर! केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीबरोबरच डीए ४ टक्क्यांनी वाढणार

जयपूर आणि धौलपूर धो धो पाऊस

शुक्रवारी अवघ्या काही तासांच्या पावसाने जयपूरची अवस्था बिकट झाली. राजस्थानचे गुलाबी शहर, जिथे पर्यटकांची नेहमीच गर्दी होते. पण मुसळधार पावसाचा नंगा नाच असा आहे की, पर्यटकांची जागा घेतली आहे. रस्त्यावर वाहने धावत आहेत की नदी, तलावात हे समजू शकले नाही का, हे लोक नाराज झाले. अशीच परिस्थिती राजस्थानच्या धौलपूरमध्ये पाहायला मिळाली, जिथे मुसळधार पावसानंतर वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे.

नांदेडमधील परिस्थिती

महाराष्ट्रातील नांदेडमधून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. पाण्याने भरलेला खड्डा जीवघेणा ठरत आहे. पाण्यात दुचाकीचा वेग जास्त नसून दुचाकीचे चाक खड्ड्यात गेल्याने दुचाकीस्वार जखमी झाला. जखमी झाल्यानंतर तो थोडावेळ तिथेच बसून राहिला. काही वेळाने लोकांनी त्याला मदत केली. हा संपूर्ण व्हिडीओ जवळच लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

महत्वाच्या बातम्या:
शेतकऱ्यांनो मालामाल होयचंय ना? तर करा ही शेती आणि कमवा लाखों
Farming Technique: भारीच की रावं! एकाच शेतातून मिळणार फळे, धान्य, भाजीपाला; जाणून घ्या दुप्पट शेतीच्या खास पद्धती

English Summary: IMD Alert: Heavy rain warning for these states
Published on: 23 July 2022, 10:39 IST