IMD Alert : राज्यात काही ठिकाणी पावसाची रिमझिम बरसात सुरु झाली आहे.राज्यात पुढील तीन दिवस ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. किंबहुना राज्याच्या अनेक भागात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे.
हवामान खात्याकडून कोकण आणि गोवा पट्टय़ात २८ मेपर्यंत काही भागात तुरळक पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आता जूनच्या पहिल्या आठवडय़ात र्नैऋत्य मोसमी वारे केरळमध्ये दाखल होतील. त्यानंतर कोकणमार्गे महाराष्ट्र आणि मुंबई परिसरात हे वारे पोहोचतील.
IMD Alert : मान्सून अडकला; महाराष्ट्रातील मान्सूनची तारीख बदलली, जाऊन घ्या तारीख..
मान्सून अडकला
अरबी समुद्रात पोहोचलेला मान्सून (Monsoon) श्रीलंकेच्या वेशीवर अडकला झाला आहे. त्यामुळे भारतातील मान्सून दाखल होण्याचा अंदाज हुकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केरळमध्ये 27 मे रोजी मान्सून येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. आता मात्र, हा अंदाज हुकण्याची शक्यता आहे. कारण गेल्या तीन दिवसापासून मान्सून श्रीलंकेच्या वेशीवरच आहे.
महाराष्ट्रातील मान्सूनची तारीख
मान्सून 21 मे रोजी अरबी समुद्रात दाखल झाला होता. नियोजित वेळेपेक्षा ६ दिवस आधीच मान्सूनचे वारे सक्रीय झाले होते. त्यामुळे 27 मे पर्यंत मान्सून केरळमध्ये तर 5 जूनपर्यंत मान्सून कोकणात पोहोचण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. बंगालच्या उपसागराबरोबरच सध्या अरबी समुद्रातूनही जमिनीकडे बाष्पयुक्त वारे वाहत आहे.
7th Pay Commission: 7व्या वेतन आयोगानंतर 8वा वेतन आयोग येणार की नाही? जाणून घ्या अपडेट
Published on: 25 May 2022, 12:23 IST