IMD Alert : उत्तर भारतात चक्रवातामुळे बुधवार ८ ते १० फेब्रुवारी दरम्यान पाऊस,बर्फवृष्टीची शक्यता असल्याने बुधवारनंतर राज्यात पुन्हा गारठा वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, रविवारी राज्यात सलग दुसऱ्या दिवशी किमान तापमान घसरल्याने वातावरणात गारवा होता.
यामध्ये उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील औरंगाबाद, परभणी, पश्चिम महाराष्ट्रात पुणे, या ठिकाणी किमान तापमान नोंदवण्यात आले. त्यामुळे थंडी जाणवत होती.
उत्तर भारतात चक्रवातामुळे पुन्हा ८ ते १० फेब्रुवारीदरम्यान पावसाचा आणि बर्फवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे वातावरणावर त्याचा परिणाम होऊन उत्तराखंड, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालमध्ये दाट धुके राहणार आहे.
परंतु राज्यात किमान तापमानाची परिस्थिती स्थिर राहणार असून वातावरणात गारठा राहणार आहे. तर आकाश कोरडे व निरभ्र असल्याने दुपारी उन्हाची तीव्रताही जाणवेल. असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
Published on: 06 February 2023, 10:34 IST