Weather

Rain Update : गेल्या काही दिवसांपासून राज्यांमध्ये सगळीकडे जोरदार पाऊस झाला. परंतु तरीदेखील काही जिल्ह्यांमध्ये हवा तेवढा पाऊस न झाल्यामुळे शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. गेल्या एक ते दोन दिवसापासून संपूर्ण राज्यांमध्ये पावसाने बऱ्याच ठिकाणी उघडीप दिल्याचे सध्या चित्र आहे. तर काही ठिकाणी अधून मधून पावसाच्या हलक्या स्वरूपाच्या सरी कोसळताना दिसून येत आहेत. परंतु राज्यामध्ये कुठेही जोरदार पाऊस पडल्याचे नोंद झालेली नाही. या पार्श्वभूमीवर येत्या दोन दिवसात राज्यात पावसाचा अंदाज कसा राहील? याबाबतची माहिती घेऊ.

Updated on 08 August, 2023 8:22 AM IST

Rain Update : गेल्या काही दिवसांपासून राज्यांमध्ये सगळीकडे जोरदार पाऊस झाला. परंतु तरीदेखील काही जिल्ह्यांमध्ये हवा तेवढा पाऊस न झाल्यामुळे शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. गेल्या एक ते दोन दिवसापासून संपूर्ण राज्यांमध्ये पावसाने बऱ्याच ठिकाणी उघडीप दिल्याचे सध्या चित्र आहे.

तर काही ठिकाणी अधून मधून पावसाच्या हलक्या स्वरूपाच्या सरी कोसळताना दिसून येत आहेत. परंतु राज्यामध्ये कुठेही जोरदार पाऊस पडल्याचे नोंद झालेली नाही. या पार्श्वभूमीवर येत्या दोन दिवसात राज्यात पावसाचा अंदाज कसा राहील? याबाबतची माहिती घेऊ.

पूर्व विदर्भातील काही ठिकाणी पावसाचा अंदाज?

 गेल्या एक ते दोन दिवसापासून संपूर्ण राज्यांमध्ये पावसाने उघडीप दिली असून येणारे दोन दिवसात देखील राज्यात पाऊस पडणार नसल्याचा एकंदरीत अंदाज आहे.तसेच सर्व विदर्भातील काही ठिकाणी पाऊस हजेरी लावू शकतो अशी शक्यता देखील हवामान विभागाच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आली आहे. परंतु महाराष्ट्राचा विचार केला तर आज पाऊस उघडीप देण्याचा अंदाज असून पुढील दोन दिवसही राज्यांमध्ये पावसाचा जोर कमीच राहील असा अंदाज आहे.

परंतु गुरुवारपासून राज्यातील पूर्व विदर्भात काही ठिकाणी पावसाचा जोर वाढेल असा अंदाज आहे. परंतु पुढील दोन दिवस राज्यात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडू शकतील असा देखील अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

 देशातील सध्याची मान्सूनची स्थिती

 सध्या देशातील मान्सूनची  स्थिती पाहिली तर दक्षिण बिहार आणि शेजारच्या परिसरामध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली होती व ती स्थिती सध्या उत्तर बांगलादेशच्या भागात समुद्रसपाटीपासून साधारणपणे 900 मीटर उंचीवर आहे. 

तसेच मान्सूनचा आस असलेला जो काही कमी दाबाचा पट्टा आहे तो पंजाब राज्यातील अमृतसर, कर्नाल, गोरखपूर तसेच भागलपूर इत्यादी परिसरामध्ये विस्तारलेला असून  हा पट्टा पूर्वेकडे मणिपूरच्या भागाकडे सध्या सरकत असल्याची स्थिती आहे. तसेच उत्तर गुजरात आणि शेजारच्या परिसरामध्ये 5.8 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची  सद्यस्थिती दिसून येत आहे.

English Summary: How will the rain forecast be in the state in the next two to four days? What is the weather condition?
Published on: 08 August 2023, 08:22 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)