Cold Weather Update : राज्यातील तापमानात घट होत असल्यामुळे थंडीची चाहूल वाढली आहे. यामुळे उन्हाच्या चटक्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. देशासह राज्यात आता थंडी वाढली आहे. मात्र नोव्हेंबर महिन्यात थंडीचा गारठा कमी राहण्याची शक्यता आहे. तसंच नोव्हेंबर महिन्यात थंडी कमी राहण्याचा अंदाजही हवामान खात्याने दिला आहे.
गेल्या काही दिवसांत राज्यभरातील तापमानात बदल होत आहे. मुंबई, कोकणसह राज्यातील तापमानात बदल झाला आहे. पहाटेच्या वेळी हवेत गारवा निर्माण होत आहे. यामुळे ऑक्टोबर हिटच्या तापमानापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र नोव्हेंबर महिन्यात तापमानात घट होण्याची शक्यता आहे. ठाणे,मुंबई, नवी मुंबई, कल्याण- डोंबिवलीसह पनवेल आणि पालघरमध्येही थंडीचा लाट आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर महिन्यात तापमानात घट होणार असली तर थंडीतील गारठा कमीच राहणार आहे. महाराष्ट्रात सुद्धा किमान तापमान अधिक राहण्याची शक्यता आहे. यामुळे थंडीचे प्रमाण अधिक राहण्याचा अंदाज आहे. तर नोव्हेंबर महिनाच्या शेवटी मुंबई, ठाणेसह कोकणात थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्राच्या काही भागात पावसाची रिमझिम सुरुच राहणार आहे. केरळ आणि तामिळनाडूमध्ये जोरदार पाऊस पाहायला मिळत आहे. केरळच्या समुद्र किनार्यालगत अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात काही भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Published on: 01 November 2023, 12:17 IST