Rain News Update :
गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर राज्यात पावसाचं आगमन आहे. मागील दोन दिवसांच्या पावसाच्या खंडानंतर आज राज्यात पावसाने हजेरी लावली आहे. राज्यात सर्वत्र पाऊस झाला नसला तरी काही भागात पाऊस झाला आहे. तर काही ठिकाणी हलका तर काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. उद्यापासून राज्यात पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
आज मंगळवारी कोकणात, मुंबईत पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढच्या २४ तासांमध्ये राज्यातील ५ जिल्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. काही भागात ढगाळ वातावरण असणार आहे.
मुंबई, पुणे, पालगर, ठाणे, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्याच्या इतर भागांमध्ये काही प्रमाणात पावसाची विश्रांती असणार आहे. कोकणातील घाटमाथ्यावरील भागामध्येही पावसाची दमदार हजेरी असणार आहे. सातारा आणि कोल्हापूर घाटमाध्यावरही अशीच परिस्थिती असणार आहे.
आज विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला होता. अमवरावती, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदीया जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट दिला होता. तर नाशिक, पुणे आणि पालघर जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला होता.
दरम्यान, उद्या बुधवारी (दि.२०) विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदीया जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. राज्याच्या इतर भागात देखील पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
Published on: 19 September 2023, 06:01 IST