Weather

येणारे दोन ते तीन दिवस पावसाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असून या कालावधीत संपूर्ण भारतात पावसाची शक्यता आहे. कमी दाबाची रेषा उत्तर पश्चिम राजस्थान ते बंगालच्या उपसागरात पर्यंत खालच्या पातळीवर कायम असल्यामुळे जोरदार वारे वाहू लागले आहेत.

Updated on 02 July, 2022 11:24 AM IST

येणारे दोन ते तीन दिवस पावसाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असून या कालावधीत संपूर्ण भारतात पावसाची शक्यता आहे. कमी दाबाची रेषा उत्तर पश्चिम राजस्थान ते बंगालच्या उपसागरात पर्यंत खालच्या पातळीवर कायम असल्यामुळे जोरदार वारे वाहू लागले आहेत.

यादरम्यान हरियाणा, पंजाब, राजस्थान, उत्तराखंड तसेच महाराष्ट्र व पश्चिम उत्तर प्रदेश मध्ये काय ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पाच जुलै रोजी उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून पुढील पाच दिवसात छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि विदर्भाच्या काही भागात हलक्‍या ते मध्यम पाऊस पडणार आहे.

नक्की वाचा:Monsoon Update: राजधानी मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग! पुढील दोन दिवस 'या' जिल्ह्यात बरसतील मान्सून धारा

तसेच ओडिषा, पश्चिम बंगाल राज्यातील गंगेच्या भागात, बिहार आणि झारखंड राज्यात पुढील चार ते पाच दिवसात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, दक्षिण गुजरात किनारपट्टीपासून दक्षिण महाराष्ट्रापर्यंत असलेल्या कमी दाबाच्या रेषेमुळे कोकण, गोवा, कर्नाटक आणि केरळ मध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असून पुढील पाच दिवसात गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्र मध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

नक्की वाचा:Maharashtra Mansoon News: येणाऱ्या 48 तासात विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा

मुंबईत मुसळधार पावसाची हजेरी

 मुंबई मध्ये मुसळधार पाऊस सुरू असून या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून मुंबईसाठी हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

संपूर्ण मुंबई शहर आता रेल्वे आणि बस सेवा यांच्यावर विपरीत परिणाम झाल्याचे पाहायला मिळत असून मुंबईतील दादर, अंधेरी, कुर्ला, चेंबूर आणि सायनसह अनेक भागात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.

नक्की वाचा:Maharashtra Mansoon News: येणाऱ्या 48 तासात विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा

English Summary: heavy rain in india that guess to meterological department india
Published on: 02 July 2022, 11:24 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)