Weather

ऑक्टोबर महिन्यामध्ये परतीच्या पावसाने महाराष्ट्रामध्ये जो काही धुमाकूळ घातला यामुळे शेतकरी बंधूंचे खूप नुकसान झाले. परंतु आता बऱ्याच दिवसापासून पावसाने उघडीप दिली असून थंडीचे प्रमाण देखील आता चांगल्यापैकी वाढले आहे. त्यामुळे आता शेतकरी बंधू खरीप पिकांच्या काढण्याच्या कामांमध्ये व्यस्त असून बरेच शेतकरी आता रब्बी हंगामाच्या तयारीला जोमात लागले आहेत.

Updated on 03 November, 2022 2:36 PM IST

 ऑक्टोबर महिन्यामध्ये परतीच्या पावसाने महाराष्ट्रामध्ये जो काही धुमाकूळ घातला यामुळे शेतकरी बंधूंचे खूप नुकसान झाले. परंतु आता बऱ्याच दिवसापासून पावसाने उघडीप दिली असून थंडीचे प्रमाण देखील आता चांगल्यापैकी वाढले आहे. त्यामुळे आता शेतकरी बंधू खरीप पिकांच्या काढण्याच्या कामांमध्ये व्यस्त असून बरेच शेतकरी आता रब्बी हंगामाच्या तयारीला जोमात लागले आहेत.

नक्की वाचा:Winter Season: मुसळधार पाऊसानंतर राज्यात किती असणार थंडी; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

 बरेच शेतकरी आता रब्बी हंगामासाठी गहू लागवडीची तसेच मका आणि कांदा पिकाच्या  रोपवाटिका टाकण्यामध्ये व्यस्त असून त्यातच आता एक शेतकऱ्यांची धडकी भरवणारी अपडेट समोर येत असून राज्यामध्ये पुन्हा एकदा अवकाळीचे ग्रहण लागण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.

या दृष्टिकोनातून  शेतकऱ्यांमध्ये विश्वासाचे स्थान निर्माण केलेले हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी देखील हवामानाचा अंदाज वर्तवला आहे तो आपण पाहू.

 पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज

 पंजाबराव डख यांनी राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस बरसणार असल्याचा अंदाज व्यक्त केला. जर आपण त्यांच्या अंदाजाचा विचार केला तर त्यांच्यामते राज्यातील 3 नोव्हेंबर ते 8 नोव्हेंबर पर्यंत अवकाळी पावसाची शक्यता असून खरीप पिकाची काढणी करत असलेल्या शेतकऱ्यांना आणि रब्बी हंगामासाठी शेतीची पूर्वतयारी करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी नक्कीच डोकेदुखी ठरवणारा आहे.

नक्की वाचा:लाल मिरचीच्या दरात विक्रमी वाढ, मिळतोय आतापर्यंतचा सर्वाधिक दर

या कालावधीमध्ये जर अवकाळी पावसाचे  आगमन झाले तर शेतकरी बांधवांना रब्बी हंगामाच्या तयारीत आणि खरीप हंगामाच्या काढणीच्या  कामांमध्ये अनेक प्रकारचा त्रास सहन करावा लागू शकतो तसेच काढलेला काही पिकांचे परत नुकसान होण्याची दाट शक्यता आहे.

पंजाबरावांच्या मते 3 नोव्हेंबर ते आठ नोव्हेंबरच्या दरम्यान राज्यामध्ये सांगली, सातारा, सोलापूर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्‍यता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढणार असून काढलेला तसेच काढणीला आलेल्या  शेतमाल सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे.

त्यासोबतच ऊसतोड कामगारांनी देखील पावसाची शक्यता लक्षात घेऊन राहण्याची व्यवस्थित सुविधा करून घेण्याचा सल्ला देखील पंजाबरावांनी  दिला आहे. अवकाळी  पावसामुळे शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढते की काय अशी परिस्थिती या अंदाजामुळे एकदा निर्माण झाली आहे.

नक्की वाचा:Market News: कोथिंबीरने केली धूम! महाराष्ट्राच्या काही भागात कोथिंबीरला 4 हजार ते मेथीला मिळत आहे 2.5 ते 3 हजार रुपये शेकडा बाजार भाव

English Summary: heavy rain guess to some district in maharashtra by panjabrao dakh
Published on: 03 November 2022, 02:36 IST