Weather

विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांच्या काही भागात जोरदार पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.

Updated on 01 September, 2023 9:33 AM IST

Weather News 

राज्याच्या बहुतांश भागात पावसाची उघडीप आहे. काहीच भागात एकदम हलका पाऊस पडत आहे. त्यातच आजही हवामान विभागाने राज्याच्या काही भागात पुन्हा एकदा जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. पूर्व विदर्भात पावसाचा जोर अधिक राहण्याचा अंदाज आहे.

मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. यासोबतच (दि.२५) विदर्भात सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.

दरम्यान, जुलै आणि ऑगस्‍ट महिन्‍यांत पावसाने खंड दिल्‍याने खरीप हंगामातील पिकांच्‍या वाढीवर आणि संभाव्‍य उत्‍पादनावर परिणाम होण्‍याची शक्‍यता निर्माण झाली आहे. 

English Summary: Heavy rain forecast in the state See which alerts are in your area
Published on: 24 August 2023, 06:25 IST