Weather

राज्यात मागच्या आठवड्यात पावसाने धुमाकूळ घातला होता. आता पावसाने विश्रांती घेतली आहे. माहितीनुसार यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. या पावसाळी (Monsoon News) काळात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

Updated on 31 October, 2022 10:26 AM IST

राज्यात मागच्या आठवड्यात पावसाने धुमाकूळ घातला होता. आता पावसाने विश्रांती घेतली आहे. माहितीनुसार यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. या पावसाळी (Monsoon News) काळात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

शेतकरी बांधवांना लाखो रुपयांचा भुर्दंड बसला आहे. दरम्यान आता शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी म्हणजे मान्सून राज्यातून माघारी फिरला आहे. परतीच्या पावसाला ब्रेक लागला आहे. भारतीय हवामान विभागाच्या मते आता राज्यात हवामान कोरडे राहणार आहे.

राज्यात आता थंडीला देखील सुरुवात होणार आहे. वाढती थंडी शेतकऱ्यांसाठी फायद्याची राहणार आहे. सध्या शेतकरी बांधव खरीप हंगामातील पिकांची हार्वेस्टिंग करत असून बहुताशी ठिकाणी रब्बी हंगामातील पिकांची पेरणी सुरू झाली आहे.

पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार, राज्यात आता परतीच्या पावसाने विश्रांती घेतली आहे. यामुळे शेतकरी बांधवांना दिलासा मिळत आहे.

मात्र असे असले तरी या महिन्याच्या शेवटी पावसाची शक्यता आहे. पंजाबराव यांच्या मते शेतकरी बांधवांनी 29 ऑक्टोबर पर्यंत आपल्या खरीप हंगामातील पिकांची हार्वेस्टिंग पूर्ण करून घ्यावी.

हेही वाचा: शेतकऱ्यांनो बोंडअळीची चिंता सोडा, बोंडअळी वर नंदुरबार पॅटर्न यशस्वी; राज्यभर चर्चा

राज्यात सध्या सोयाबीन मका तसेच इतर खरीप हंगामातील पिके काढणीसाठी तयार झाली आहेत. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांनी या पिकांची काढणी करून घ्यावी.

कारण 30 ऑक्टोबर च्या आसपास राज्यात पावसाची शक्यता आहे. राज्यात थंडीचा जोर वाढणार आहे मात्र 30 ऑक्टोबरच्या आसपास पुन्हा एकदा पाऊस होणार असल्याने शेतकऱ्यांना काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

हेही वाचा: मोठी बातमी: ...तर सरपंच, सदस्य, ग्रामसेवक यांचे पद रद्द होणार

English Summary: heavy rain fall state Alert warning Meteorological Department
Published on: 26 October 2022, 11:08 IST