Weather

राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. सध्या पावसाने विश्रांती घेतली असताना पाहायला मिळत आहे. मात्र अशातच हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तविली आहे. यासह हवामान विभागाने सावधान राहण्याचा इशारा देखील दिला आहे.

Updated on 06 October, 2022 9:48 AM IST

राज्यात पावसाचा (rain) जोर कमी झाला आहे. सध्या पावसाने विश्रांती घेतली असताना पाहायला मिळत आहे. मात्र अशातच हवामान खात्याने (Meteorological Department) पावसाची शक्यता वर्तविली आहे. यासह हवामान विभागाने सावधान राहण्याचा इशारा देखील दिला आहे.

हवामान विभागाने (Meteorological Department) आज संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यात यलो अलर्ट दिला आहे. यासह पश्चिम महाराष्ट्रात देखील पुणे वगळता अन्य जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

कालपासून राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. 5 ते 10 ऑक्टोबर या कालावधीत राज्यातून मान्सून माघारी फिरणार आहे.

अशातच आज हवामान विभागानं राज्यात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आज विदर्भासह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात देखील पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

दिलासादायक! सौर पंपासाठी तब्बल १५ कोटी २७ लाख रुपयांचा निधी मंजूर

यलो अलर्ट म्हणजे काय?

यलो अलर्ट (yellow alert) म्हणजे नेमकं काय असा प्रश्न सगळ्यांना पडला असेल. तर या यलो अलर्टमध्ये हवामान खात्यानं हलक्या पावसाची शक्यता वर्तवलेली असते. विशेष म्हणजे यलो अलर्ट हा सावध राहण्यासाठी दिला जातो.

महत्वाचे म्हणजे हा इशारा वॉचसाठी दिलेला असतो. जेव्हा हवामानात बदल होतो तेव्हा हा यलो अलर्ट दिला जातो. तुम्‍हाला तत्‍काळ धोका नाही. परंतु, हवामानाची स्थिती पाहता, तुम्‍ही ठिकाण आणि तुमच्‍या प्रवासाची काळजी घेतली पाहिजे, असे या अलर्टचा अर्थ आहे.

सातारा जिल्ह्यात सोलर पॅनलवर चालणाऱ्या तब्बल 202 योजना मंजूर; शेतकऱ्यांना होणार फायदा

परतीच्या पावसासाठी पोषक वातावरण

विशेष म्हणजे 5 ते 10 ऑक्टोबर (October) दरम्यान मान्सून माघारी फिरणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. दुसरीकडे वायव्य राजस्थान आणि गुजरातमधील कच्छमधून मान्सून आधीच माघारी परतला आहे.

जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, पश्चिम उत्तर प्रदेश, हरियाणासह दिल्ली या ठिकाणाहूनही मान्सून माघारी फिरला आहे. त्यामुळं आता पावसाची शक्यता कमी आहे. तर 8 ऑक्टोबरला मुंबईतून मान्सून (rain) निरोप घेणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. त्यामुळं 10 ऑक्टोबर नंतर राज्यात पावसाची शक्यता कमी असण्याची शक्यता वर्तविली आहे.

महत्वाच्या बातम्या 
पोस्टाच्या सेव्हिंग स्किममधील गुंतवणूकदारांसाठी खुशखबर; सरकार देणार दसऱ्याची मोठी भेट, होणार फायदाच फायदा
सावधान! ही लक्षणे जाणवल्यास समजा तुमच्या फुप्फुसात पाणी भरलंय; जाणून घ्या सविस्तर
शेतकऱ्यांनो जनावरांच्या आरोग्यात लोहाचा समावेश करा; उत्पादनात होईल वाढ

English Summary: Heavy rain fall part state Alert warning Meteorological Department
Published on: 06 October 2022, 09:48 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)