Weather

खानदेश, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली आहे. कोकणात पावसाचा जोर कमी झाला असला तरी अनेक ठिकाणी पावसाची संततधार कायम आहे.

Updated on 01 September, 2023 9:50 AM IST

पुणे

राज्यात पावसाने विश्रांती दिली असली तरी अधून मधून हलक्या सरी सुरु आहेत. आज (दि.४) रोजी कोकण, घाटमाथ्यावर तुरकळ ठिकाणी जोरदार पावसाचा (Havey Rain) इशारा दिला आहे. तसंच पावसाच्या उघडीपसह हलकासा पाऊस राज्यात होण्याची शक्यता आहे.

खानदेश, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली आहे. कोकणात पावसाचा जोर कमी झाला असला तरी अनेक ठिकाणी पावसाची संततधार कायम आहे. घाटमाथ्यावर बऱ्यापैकी जोर कायम आहे. 

सध्या कोल्हापूरमध्ये पावसाचा जोर कायम आहे. तसंच मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडत आहे. साताऱ्यातील महाबळेश्‍वर येथे ११२.८ मिलिमीटर पाऊस पडला.

दरम्यान, कोल्हापूर पावसाची संततधार सुरु असल्यामुळे जिल्ह्यातील अद्यापही काही बंधारे पाण्याखाली आहेत. खानदेशातील सर्वच भागांत पाऊस नाही. नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी हलका पाऊस पडला. 

English Summary: Heavy rain continues on Ghatmatha See the weather forecast
Published on: 04 August 2023, 10:42 IST