राज्यात जवळपास एक महिन्यांपासून पावसाने खंड दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे. एक महिन्यापासून पावसाची विश्रांती असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे. पण राज्याचा काही भाग वगळता इतरत पाऊस पडत नाही.
त्यातच हवामान विभागाने राज्याच्या काही भागात जोरदार पावसाचा अंदाज दिलाय आहे तर काही ठिकाणी हलक्या सरी पडतील, असा अंदाज व्यक्त केला आहे.
राज्यात ढगाळ वातावरण आहे. तर कधी ऊन सावल्यांचा खेळ सुरु आहे. तसंच हवामान खात्याने विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मराठवाड्यात देखील हवामान खात्याने हलका ते मध्यम पावसाच अंदाज व्यक्त केला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
दरम्यान, कोकणात देखील हवामान विभागाने पावसाचा अंदाज दिला आहे. कोकणातील चार जिल्ह्यात विजांसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
Published on: 23 August 2023, 06:42 IST