Weather

राज्यात बऱ्याच दिवसापासून अनेक भागांमध्ये पावसाने विश्रांती घेतलेली होती परंतु आता संपूर्ण राज्यामध्ये पाऊस पुन्हा सक्रिय होत असून बऱ्याच भागामध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. येत्या गुरुवारपासून संपूर्ण राज्यात मान्सून सक्रिय होऊन पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Updated on 06 September, 2022 8:46 AM IST

राज्यात बऱ्याच दिवसापासून अनेक भागांमध्ये पावसाने विश्रांती घेतलेली होती परंतु आता संपूर्ण राज्यामध्ये पाऊस पुन्हा सक्रिय होत असून बऱ्याच भागामध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. येत्या गुरुवारपासून संपूर्ण राज्यात मान्सून सक्रिय होऊन पावसाचा जोर वाढण्याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

येणाऱ्या तीन ते चार दिवसांमध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल अशी शक्यता आहे. गुरुवारपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे अशी माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करून दिली आहे.

नक्की वाचा:Rain Alert: राज्यात मुसळधार पावसाचा जोर वाढणार! या जिल्ह्यांना अलर्ट जारी

 महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना आहे पावसाचा इशारा

1- सहा सप्टेंबर-सातारा,सांगली,सोलापूर, कोल्हापूर, उस्मानाबाद, अहमदनगर, बीड, औरंगाबाद, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, वाशिम, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, अमरावती, वर्धा, चंद्रपुर, नागपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा

नक्की वाचा:IMD Alert: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय; या भागात यलो अलर्ट

2- 7 सप्टेंबर-पुणे,सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, उस्मानाबाद, बीड, नगर, जालना, औरंगाबाद, परभणी, हिंगोली,  लातूर आणि नांदेड

3- 8 सप्टेंबर-पुणे,सातारा, कोल्हापूर, नाशिक,नगर,उस्मानाबाद,बीड,लातूर,जालना,परभणी,नांदेड आणि हिंगोली

नक्की वाचा:Climate Change: ऑक्टोबर हीट आता जाणवणार सप्टेंबरमध्येच,'या' जिल्ह्यात होणार सरासरीपेक्षा अधिक पाऊस

English Summary: guess of heavy rain in maharashtra from will be coming first day
Published on: 06 September 2022, 08:46 IST