काही दिवसांपासून उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाल्यानंतर देशातील काही भागांमध्ये पुन्हा कडक उन्हाचा तडाखा बसू लागला आहे.
दिल्लीत सुरू असलेल्या 'लु' मुळे उष्णतेचा प्रकोप वाढला असून सध्या तरी यातून दिलासा मिळेल अशी अपेक्षा नाही. देशाचे उत्तर पश्चिम आणि मध्य भाग पुन्हा उष्णतेच्या तडाख्यात आले असून अनेक शहरांमध्ये तापमान 45 अंशाच्या पुढे गेले आहे.
या बाबतीत आय एम डी ने जाहीर केले की, येणाऱ्या दोन तीन दिवसात उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतातील काही भागात उष्णतेची लाट येण्याची दाट शक्यता आहे. चार आणि पाच जूनला राजस्थान, जम्मू, हिमाचल आणि दिल्ली येथे विविध ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
हवामान खात्याने आपल्या बुलेटीन मध्ये ह्या बाबतीत म्हटले आहे की, विदर्भ, झारखंड, ओडिषा आणि छत्तीसगडच्या काही भागात चार ते सहा जून दरम्यान उष्णतेची लाट येऊ शकते. त्यादरम्यान दुसरीकडे म्हणजेच दक्षिण उत्तर प्रदेश आणि उत्तर मध्य प्रदेशातचार ते आठ जून पर्यंत उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
राजस्थानच्या गंगानगर मध्ये शनिवारी 47.5 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. तर हिस्सार आणि उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात 46.8अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.
बेस स्टेशन सफदरजंग येथे 43.9अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.राजस्थान,जम्मू,हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, झारखंड, विदर्भ, उत्तर प्रदेश आणि उत्तर मध्य प्रदेशात पुढील दोन ते तीन दिवस उष्णतेची लाट येऊ शकते असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
देशातील या भागात पडू शकतो पाऊस
भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे की चार ते पाच जून रोजी राजस्थान आणि वायव्य मध्यप्रदेशात 30 ते 40 किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून7 जून पासून दक्षिण द्विपकल्पीय भारतात मुसळधार पाऊस पडू शकतो. पुढील पाच दिवसात ईशान्य भारत आणि उप हिमालयीन पश्चिम बंगालआणि सिक्कीम मध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
Published on: 05 June 2022, 11:51 IST