Weather

हवामान विभागाकडून पावसाळा सुरू झाला की ऑरेंज अलर्ट, यलो अलर्ट असे वेगवेगळे अलर्ट देण्यात येतात. या अलर्टच्या माध्यमातुन हवामान विभागाकडून नागरिकांना खबरदारीचा इशारा देण्यात येतो. पण कित्येक जणांना हवामान विभागाच्या या अलर्टसबद्दलची संकल्पनाच माहित नाही आहे.

Updated on 05 October, 2023 5:38 PM IST

हवामान विभागाकडून पावसाळा सुरू झाला की ऑरेंज अलर्ट, यलो अलर्ट असे वेगवेगळे अलर्ट देण्यात येतात. या अलर्टच्या माध्यमातुन हवामान विभागाकडून नागरिकांना खबरदारीचा इशारा देण्यात येतो. पण कित्येक जणांना हवामान विभागाच्या या अलर्टसबद्दलची संकल्पनाच माहित नाही आहे. भारतीय हवामान विभाग (IMD-India Meteorological Department) कडुन पावसाच्या स्थितीनुसार अलर्ट सांगितल्या जातो. जेणेकरून नागरिकांना त्यांच्या भागातील पावसाचा नेमकाअंदाज कळतो आणि नागरिक सतर्क राहुन संभाव्य धोके कमी होण्यास मदत होते.

रेड अलर्ट -
हवामानाच्या दृष्टीने अतिधोकादायक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते तेव्हा हवामान विभागकडून रेड अलर्ट देण्यात येतो. ढगफुटी, अतिवृष्टी, पूर, अतिजोरदार पाऊस, भुस्खलन अश्याप्रकारच्या मोठ्या नैसर्गिक आपत्ती वेळी त्या भागाला रेड अलर्ट दिला जातो. या अलर्टमध्ये नागरिकांना स्थलांतर देखील करावे लागू शकते. रेड अलर्टमध्ये जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता जास्त असते. रेड अलर्ट दिल्यानंतर कोणतीही जीवीत व वित्त हानी होऊ नये याची काळजी घेण्यासाठी आपात्कालीन विभाग, प्रशासकीय यंत्रणा, आरोग्य यंत्रणा, पुनर्वसन विभाग, विद्युत विभाग, फायर ब्रिगेड, अशी प्रमुख विभागे सतर्क असतात.
ऑरेंज अलर्ट -
हवामान खात्याकडून ज्या भागांमध्ये मुसळधार पाऊस होत असेल त्या ठिकाणी ऑरेंज अलर्ट दिला जातो. ऑरेंज अलर्टमध्ये, रेड अलर्टपेक्षा थोडी कमी धोकादायक परिस्थिती असते. ऑरेंज अलर्टचा अर्थ म्हणजे अत्यंत जोरदार किंवा जोरदार पाऊस होवुन नैसर्गिक आपत्ती कोणत्याही क्षणी येण्याची शक्यता असते. अशा वेळी नागरिकांनी योग्य ती काळजी घेऊन बाहेर पडावे अशी सुचनाही दिलेली असते.

यलो अलर्ट-
यलो अलर्ट ही पावसाच्या खतऱ्याची पहिली घंटा असते. ज्या भागात काही वेळाने आपत्ती येण्याची शक्यता असेल त्या भागातील नागरिकांना सावधगिरीचा इशारा देण्यासाठी हवामान विभाग यलो अलर्ट देते.
ग्रीन अलर्ट-
ग्रीन अलर्टमध्ये असलेली ठिकाणे ही नैसर्गिक आपत्तीपासून सुरक्षित असतात. या ठिकाणी पाऊस कमी प्रमाणात असतो.

English Summary: Green, yellow, orange, red alert of rain is really what? Find out..
Published on: 05 October 2023, 05:38 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)