Weather

शेतकऱ्यांना दिलासा देणारा अंदाज हवामान विभागाने दिला. सप्टेंबर महिन्यात मराठवाडा आणि कोकणाच्या काही भागांत चांगला पाऊस होऊ शकतो, असंही हवामान खात्याने म्हटले आहे.

Updated on 01 September, 2023 9:15 AM IST

Rain News :

ऑगस्ट महिना संपला तरी राज्यात अपेक्षित झाला नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. त्यातच हवामान खात्याने आज (दि.३१) नवा पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो. सप्‍टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्‍ये पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. तर सप्टेंबरमध्ये मध्यापर्यंत चांगला पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

सप्टेंबर महिन्यात मराठवाडा आणि कोकणाच्या काही भागांत चांगला पाऊस होऊ शकतो, असंही हवामान खात्याने म्हटले आहे.

ऑगस्ट महिना संपला तरी राज्यात पावसाने हजेरी लावली नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. पाण्याअभावी पीके सुकण्याच्या मार्गावर आहेत. सध्या पिकांना पाण्याची जास्त गरज आहे. याच दरम्यान हवामान खात्याने सप्टेंबर महिन्यात चांगल्या पावसाचा अंदाज दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

सप्टेंबर महिन्यात पाऊस झाल्यास शेतकऱ्यांना दिलासा देण्याची शक्यता आहे.  कोकण आणि गोव्यातही चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रासह मध्य भारतातही पावसाला सुरुवात होऊ शकते. कर्नाटक आणि केरळ राज्यातही पावसाचा अंदाज आहे, असंही हवामान शास्त्रज्ञ यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, ऑगस्ट महिन्यात मोठ्या प्रमाणात पावसाने उघडीप दिली आहे. पण आता सप्टेंबर महिन्यात पाऊस सुरु होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

English Summary: Good news Heavy rains in the first week of September Weather Update News
Published on: 31 August 2023, 04:35 IST