सध्या महाराष्ट्राला पाऊस अक्षरशः झोडपत असून राज्यात बऱ्याच ठिकाणी मोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईत तर पावसाने दाणादाण उडवली असून पूर्ण मुंबई तुंबली आहे.त्यामुळे नागरिकांना प्रचंड समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील मुसळधार पाऊस सुरू असून विविध ठिकाणी पावसाने चांगली हजेरी लावली आहे.
हवामान खात्याने येणाऱ्या तीन चार दिवस मुंबईत जोरदार पावसाची शक्यता वर्तवली असून यावेळी मुंबईकरांनी सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यामध्ये देखील अनेक भागात मुसळधार पाऊस पडत असून अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
त्यामुळे बऱ्याच ठिकाणी शेतकरी बांधवांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून पिकांची नासाडी होईल की काय? ही भीती निर्माण झाली आहे.
मराठवाड्यात देखील कालपासून चांगला पाऊस पडत आहे. अजून देखील मराठवाड्यात शेतकरी बांधवांना चांगल्या पावसाची प्रतीक्षा असून शेतकरी चांगल्या पावसाची वाट पाहत आहे.
नक्की वाचा:Punjabrao Dakh: पंजाबराव यांचा 17 जुलैपर्यंतचा मान्सूनचा अंदाज, वाचा सविस्तर
परंतु या सगळ्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांमध्ये विश्वास असलेले आणि संपूर्ण महाराष्ट्रात हवामान अंदाजासाठी प्रसिद्ध पंजाबराव डख यांनी त्यांचा हवामान अंदाज जारी केला आहे.
त्यांच्या मते आज आणि उद्या महाराष्ट्रात मोठ्या पावसाची शक्यता असूनआज पासून संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस बघायला मिळेल. परंतु हवामानात अचानक बदल झाल्याने पंढरपूर व आजूबाजूच्या परिसरात अतिवृष्टी सारखा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
त्यामुळे आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. पंजाब रावांनी भाविकांना सतर्क राहण्याचा इशारा यावेळी दिला आहे.
पंजाबरावाच्या मते 'या' जिल्ह्यांमध्ये होईल पाऊस
पंजाबराव डख साहेब यांच्या मते, नऊ ते दहा जुलै दरम्यान संपूर्ण राज्यात मोठा पाऊस होणार असून लातूर, बीड, सोलापूर, पंढरपूर, सातारा, सांगली, अहमदनगर, कोकणची किनारपट्टी, पूर्व आणि पश्चिम विदर्भ आणि उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात मोठा पाऊस होणार असल्याचे देखील पंजाबराव यांनी स्पष्ट केले आहे.
Published on: 09 July 2022, 10:41 IST