Weather

मुंबई : महाराष्ट्रातील प्रत्येक जण ज्या गोष्टीची गेल्या काही दिवसांपासून आतुरतेनं वाट पाहत होता. तो दिवस आज उजाडला आहे. महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झालेलं आहे. दक्षिण महाराष्ट्रात पावसानं हजेरी लावली आहे.

Updated on 11 June, 2023 4:25 PM IST

मुंबई : महाराष्ट्रातील प्रत्येक जण ज्या गोष्टीची गेल्या काही दिवसांपासून आतुरतेनं वाट पाहत होता. तो दिवस आज उजाडला आहे. महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झालेलं आहे. दक्षिण महाराष्ट्रात पावसानं हजेरी लावली आहे.

८ जून रोजी केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांनतर महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला आहे. महाराष्ट्रातील रत्नागिरीमध्ये मान्सून पोहोचला आहे. भारतीय हवामान विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे. दरवर्षीच्या तुलनेत मान्सून यंदा चार ते पाच दिवस उशिरा आलेला आहे.

भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्या मान्सून महाराष्ट्रातील रत्नागिरीपर्यंत पोहोचला आहे. तर कर्नाटकातील शिमोगा, हसन या शहरांसह धर्मपुरी, श्रीहरी कोटा इथपर्यंत मान्सून पोहोचला आहे. मान्सून दाखल होण्याचा दरवर्षीचा अंदाज पाहता यंदा मान्सून चार ते पाच दिवस उशिरानं दाखल झाला आहे.

मान्सून महाराष्ट्रात दाखल

महाराष्ट्रातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक मान्सून कधी दाखल होणार याकडे डोळे लावून बसले होते. अखेर राज्यात मान्सूनचं आगमन झालं आहे. महाराष्ट्रात आज म्हणजे ११ जून रोजी मान्सून दाखल झाला आहे. महाराष्ट्रात रत्नागिरीपर्यंत मान्सून पोहोचला आहे.

महाराष्ट्रात येत्या ३-४ तासात रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि ताशी ३०-४० किमी वेगाने वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे, IMD ने याबाबत माहिती दिली आहे.

केरळात उशिराने मान्सून धडकल्याने महाराष्ट्रातही मान्सून लांबणार असल्याची चर्चा होती. मात्र आज राज्यात मान्सूनने हजेरी लावली. राज्यात पुढच्या 4, 5 दिवसात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

English Summary: Finally, Monsoon has entered Maharashtra, how far it has reached, know the update
Published on: 11 June 2023, 04:25 IST