पुणे
राज्यात पावसासाठी पुन्हा पूरक वातावरण झाले आहे. त्यामुळे काही भागात तूरळक ठिकाणी पावसाची हजेरी लावली आहे. आज (ता. १९) विदर्भासह, उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा आहे. तर विदर्भासह, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे पश्चिम टोक हिमालयाच्या पायथ्याकडे कायम आहे. पूर्व टोक त्याच्या सर्वसाधारण स्थितीच्या दक्षिणेकडे आले आहे. त्यामुळे मान्सूनचे आस गोरखपूर, देहरी, रांची, बालासोर, कमी दाबाचे केंद्र ते वायव्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे.
दरम्यान, राज्यात ढगाळ हवामान तयार झाले आहे. तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. आज विदर्भातील अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा,
Published on: 19 August 2023, 10:30 IST