राज्यातील अनेक शहरांचे तापमान कमी होऊन थंडीच्या कडाक्यात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिली आहे. मागील महिन्यात पावसाने उघडीप दिल्याने राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा जाणवु लागला होता. परंतु आता गेल्या काही दिवसांपासून नागरीकांना ऑक्टोबर हिट पासून दिलासा मिळू लागला आहे.
हवामान विभागातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार,राज्यात पुढील पाच दिवस पावसाची शक्यता नाही, तसेच थंडीत वाढ होणार आहे . त्यामुळे रब्बीतील हंगामातील पेरणीला वेग आला आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमान कमी होऊ लागले आहे. राज्यातील विविध भागात सकाळी आणि संध्याकाळी थंडी जाणवत आहे. तसेच दोन दिवसांत राज्यातील तापमानात घसरण होणार आहे.
आता येत्या दोन दिवसांत राज्यातील अनेक शहरात काही दिवस थंडीची लाट येणार आहे. मागील २४ तासात राज्यातील जळगावचे तापमान १३.२ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले होते. जळगावपेक्षा महाबळेश्वरचे तापमान अधिक असून १६.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. तसेच वातावरणातील आर्द्रता कमी झाल्यामुळे थंडीला सुरुवात झाली आहे. येत्या 2 दिवसात राज्यातील तापमानात १ ते २ अंशाने बदल होवून वातावरणातील गारवा वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
Published on: 26 October 2023, 06:15 IST