Weather

राज्यात मागच्या काही दिवसांपासून गायब झालेली थंडी पुन्हा येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पश्चिमी चक्रवाताचा प्रभाव हिमालयीन भागात वाढल्याने उत्तर भारतात पुन्हा थंडी वाढली आहे. त्यामुळे या भागाकडून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात थंड वारे वाहण्याची शक्यता आहे.

Updated on 04 February, 2023 10:19 AM IST

राज्यात मागच्या काही दिवसांपासून गायब झालेली थंडी पुन्हा येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पश्चिमी चक्रवाताचा प्रभाव हिमालयीन भागात वाढल्याने उत्तर भारतात पुन्हा थंडी वाढली आहे. त्यामुळे या भागाकडून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात थंड वारे वाहण्याची शक्यता आहे.

त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून गायब झालेली थंडी राज्यात पुन्हा वाढली आहे. शुक्रवारी (दि.03) राज्यात औरंगाबाद शहराचे किमान तापमान 9.6 अंशांपर्यंत घसरले, तर पुणे शहराचे किमान तापमान 11.5 अंशांवर आले होते.

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातून गेल्या 8 ते 10 दिवसांपासून थंडी गायब झाली होती. या परिणामामुळे राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आदी भागांत पावसानेदेखील हजेरी लावली होती. पुढील काही दिवस राज्यात थंडी कायम राहण्याचा अंदाज आहे.

दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा दक्षिण भाग, मध्य प्रदेशाचा पश्‍चिम भाग आणि दक्षिणेकडील राज्यात कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता हवामान विभागने अधिक आहे.मध्य महाराष्ट्रात बऱ्यापैकी अजून गारवा आहे. विदर्भातही नांदेड वगळता बाकी जिल्ह्यांमध्ये किमान आणि कमाल तापमान फार वाढण्याची शक्यता कमी असल्याचं IMD कडून अंदाज वर्तवण्यात आला आहे.

स्कायमेटने दिलेल्या माहितीनुसार, उत्तराखंडमध्ये आज पावसाची शक्यता आहे. तर तामिळनाडू आणि केरळच्या दक्षिण भागातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गिलगिट-बाल्टिस्तान, मुजफ्फराबाद, लडाख, जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशच्या काही भागात येत्या २४ तासांत हलका ते मध्यम पाऊस आणि बर्फवृष्टी होऊ शकते.

English Summary: Cold will set in again in the state, mercury falls
Published on: 04 February 2023, 10:19 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)