Pune News : पुण्यात मागील काही दिवसांपासून तापमानात घट झाली आहे. त्यासोबतच रात्रीच्या तापमानात देखील घट झाली असून तापमान १४ ते १५ अंश सेल्सिअस अंशावर आहे. यामुळे पुण्यात थंडीचा जोर वाढण्यास सुरुवात झाली आहे. तसंच आगामी काळात देखील थंडीत वाढ होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्याचे प्रमाण वाढल्याने हवेत गारवा निर्माण झाला आहे. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे. मागील काही दिवसांत तापमानाच चांगली घट झाली असून आणखी काही दिवस तापमानात घट होणार असल्याचं देखील हवामान खात्याने सांगितले आहे.
आगामी काळात पुण्यातील तापमान कमी होणार असून थंडी वाढणार आहे. मागील काही दिवसांपूर्वी पुण्यात ऑक्टोबर हिटचा चटका होता. त्यामुळे नागरिक गरमीने हैराण झाले होते. पण आता तापमानात घट होत असल्याने आता गारठा वाढण्यास सुरुवात झाली आहे.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून राज्यातील तापमानाचा पारा कमी जास्त होत आहे. यामुळे काही भागात ढगाळ वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे हवामान खात्याने पुढील काही दिवस पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. राज्यातील तापमानात घट झाल्याने गारवा वाढला आहे. तर हवामान खात्याने आज (दि.४) सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
Published on: 04 November 2023, 06:06 IST