Weather News : देशातून मान्सून परतल्यामुळे गुलाबी थंडीची चाहूल सुरु झाली आहे. उत्तर भारतात थंडी वाढण्यास सुरुवात झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. तसंच पंजाब, हरियाणा,बिहार, उत्तरप्रदेश, तामिळनाडू आणि केरळमध्ये पावसाचा अंदाज देखील व्यक्त केला आहे. दिल्लीत पुढील पाच दिवस दाट धुक्याचा अंदाज देखील व्यक्त करण्यात आला आहे.
उत्तर भारतात थंडी पडण्यास सुरुवात झाली असल्याने रात्री आणि पहाटेच्या वेळी वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. सकाळ-संध्याकाळ फिरायला बाहेर पडणारे लोकही हलके आणि उबदार कपडे घातलेले दिसून येऊ लागले आहेत. दरम्यान, येत्या काही दिवसांत उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीचा जोर वाढण्याचा अंदाजही हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीरसह देशातील डोंगराळ राज्यांमध्ये बर्फवृष्टी सुरू आहे. त्यामुळे त्याचा परिणाम मैदानी भागावर होण्याची शक्यता आहे, त्यामुळे या भागातील तापमानात घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
राज्यातही थंडीची चाहूल
राज्यातील तापमानात घट होऊ लागली आहे. यामुळे राज्यात देखील थंडीची चाहूल वाढण्यास सुरुवात झाली आहे. काल (दि.२३) रोजी जळगाव येथे राज्यातील नीचांकी १५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
दरम्यान, राज्यातील तापमानात घट होऊ लागली आहे. अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा १८ अंशांच्या खाली आला आहे. जळगाव येथे राज्यातील निचांकी तापमानाची नोंद झाली आहे. यामुळे आगामी काळात राज्यात थंडी वाढण्याची शक्यता आहे.
Published on: 24 October 2023, 11:17 IST