नोव्हेंबर महिन्याचा तिसरा आठवडा सुरु आहे. आता काही अंशी वातावरणात गारवा येत आहे. मागच्या दोन दिवसांपासून राज्यात थंडीचा कडाका काहीसा वाढला आहे. कोकण वगळता उर्वरित राज्यात बहुतांश भागात किमान तापमानात 15 अंशांच्या खाली नोंद झाली आहे. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र असो की मराठवाडा सर्वच ठिकाणी थंडीचा कडाका सुरु झाला आहे. ज्यामुळे ग्रामीण भागासह शहरातही शेकोट्या पेटायला सुरुवात झाली आहे.
आता मध्य महाराष्ट्रात 22 नोव्हेंबरपर्यंत तीन दिवस कडाक्याची थंडी जाणवणार आहे. ओझरला आज 5.7 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली. तर निफाडचा पारा 7 अंशावर आहे. नाशिकमध्ये थंडीचा कहर पाहायला मिळतोय.
हाडे गोठवणाऱ्या थंडीने नाशिककरांना गारव्याचा फटका बसत आहे. यंदाच्या हंगामातील सर्वात निश्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. कडाक्याच्या थंडीने द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे.
धरणे अजून शंभर टक्के! शेतकऱ्यांची रब्बीची चिंता मिटली..
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात थंडीच्या लाटेचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यातील किमान तापमानात घट झाल्याचं पाहायला मिळत आहे.
नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव आणि अहमदनगर जिल्ह्यातील काही ठिकाणी तापमान 10 अंश सेल्सिअस खाली राहण्याचा अंदाज आहे. तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात तापमान 12 अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
पांढरे सोने शेतकऱ्यांना श्रीमंत करणार; कापसाच्या दरात मोठी वाढ
दररोजच्या दमट हवामानाचा सामना करणाऱ्या मुंबईकरांनाही थंडीचा अनुभव घेत आहे. मुंबईतही हवेत गारवा जाणवू लागला आहे. शहरातील किमान तापमान 17.5 अंश सेल्सिअसवर पोहोचलं आहे.
Published on: 21 November 2022, 02:18 IST