पुणे
मागील तीन आठवड्यापासून राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे शेतकरी पावसाची वाट पाहत आहे. तर पेरणी केलेली पीके पाण्याअभावी जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहेत. पण आता राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होतंय. त्यामुळे उद्यापासून राज्याच्या अनेक भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यात पाऊस सुरु होईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. याचबरोबर विदर्भात आणि मराठवाड्याच्या काही भागात जोरदार पावसाचा यलो अलर्टही हवामान खात्याने दिला आहे.विदर्भात उद्या येलो अलर्ट आहे.
दरम्यान, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये काही ठिाकणी विजांसह जोरदार पावसाचा अंदाज आहे.
Published on: 17 August 2023, 04:49 IST