Weather Update : राज्याच्या काही भागात कमी अधिक पाऊस होत आहे. पुढील दोन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. तसंच दक्षिण कोकणात अधिक मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
दक्षिण कोकण, कोकण आणि गोवा किनाऱ्यावर अरबी समुद्रात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे दक्षिण कोकणात गोव्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
कोकण किनारपट्टीवरच्या समुद्रात चक्रीवादळ तयार होत आहे. त्यामुळे त्याचा प्रभाव अधिक कोकण आणि गोवा किनारपट्टीवर होणार आहे. दक्षिण कोकण आणि गोवा किनारपट्टीपासून पूर्वमध्य अरबी समुद्रावर सुमारे ११० किमी खोल समुद्रात हे चक्रीवादळ होत आहे. त्यामुळे पश्चिम-पणजी ते रत्नागिरी दरम्यान या चक्रीवादळाचा प्रभाव पाहायला मिळत आहे.
पुढील दोन दिवसांत समुद्रात देखील मोठ्या लाटा तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टी भागातील मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देखील हवामान खात्याने दिल्या आहेत.
आज (दि.३०) रोजी मराठवाड्यात काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना आणि अन्य भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे.
दरम्यान उद्या (दि.१) ऑक्टोबरला रविवारी विदर्भ, मराठवाडा, कोकणातील काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर सोमवारपासून राज्यात पावसाचा देखील कमी होईल, असंही हवामान खात्याने म्हटलं आहे.
Published on: 30 September 2023, 05:05 IST