राज्यातील अनेक शहरांचे तापमान कमी होऊन थंडीच्या कडाक्यात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. राज्यात काही दिवसांपासून तापमानात चढ-उतार होत आहे. मध्य महाराष्ट्र आणि आणि विदर्भातही पारा खाली घसरला आहे. तर २३ नोव्हेंबरपासून कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
तसेच उत्तर महाराष्ट्रात किमान तापमान वाढ झाली आहे. राज्यात मागील काही दिवसांपासून बहुतांश भागांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. मात्र 23 नोव्हेंबर नंतर आग्नेयेकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळं दक्षिण महाराष्ट्रात तापमानवाढ नोंदवली जाऊ शकते. त्याचबरोबर गुरुवार नंतर दक्षिण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत हलक्या सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मागील 24 तासांत राज्यातील रत्नागिरी येथे 35 अंश सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली. तर, सर्वात कमी तापमानाची नोंद जळगावात 14 अंश सेल्सिअस इतकी करण्यात आली. तसेच येत्या काही दिवसांमध्ये राज्यातील तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट होण्याचा अंदाज आहे. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात गारठा जाणवेल असाही अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
Published on: 20 November 2023, 06:30 IST