Rain Update :
राज्याच्या काही भागात आज पावसाने हजेरी लावली आहे. मात्र हा पाऊस झाला नसून काही तुरळक भागात झाला आहे. तर काही ठिकाणी चांगला पाऊस झाला आहे. उद्या गुरुवारी दि.२१) राज्याच्या आणखी काही भागातही पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने दिला.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे येत्या ४ ते ५ दिवसांत राज्यात पावसाची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाड्याच्या काही तुरळक पाऊस तर काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसंच कोकण गोव्याच्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
उद्या (दि.२१) विदर्भ आणि मराठवड्यात पावसाचा यलो अलर्ट हवामान खात्याने जारी केला आहे. विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदीया जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. तर राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
दरम्यान, शुक्रवारी (दि.२२) संपूर्ण विदर्भासह मराठवड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात हवामान खात्याने पावसाचा अलर्ट दिला आहे. पुणे, सातारा, नाशिक आणि नगर जिल्ह्यातही पावसाचा अलर्ट आहे.
Published on: 20 September 2023, 06:03 IST