Rain News : राज्यातील मध्य महाराष्ट्र, कोकण आणि दक्षिण भागात पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. तर काही काही भागात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. तसंच राज्यात हवामान कोरडे झाल्यामुळे ऑक्टोबर हिटचा चटका देखील वाढला आहे. तापमानात देखील चढ-उतार सुरु आहे.
आज कोकणात आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता आहे. उर्वरित भागात कोरडे हवामान राहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
देशातून मान्सूनची माघार
यंदाच्या पावसावर अल निनोचा परिणाम झाला आहे. त्यामुळे राज्यात कमी पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे आगामी पाणीटंचाई भासण्याची शक्यता आहे. तसंच १९ ऑक्टोबर रोजी मान्सूनने देखील देशातून माघार घेतली असल्याची माहिती हवामान खात्याने जाहीर केली आहे. यंदा देशात ४ महिने ११ दिवस मान्सून होता.
दरवर्षी १५ ऑक्टोबर रोजी परतणारा पाऊस यंदा १९ ऑक्टोबर रोजी देशातून परतला आहे. त्यानंतर परतीच्या पावसाने राज्यासह आणि देशात दिलासा दिलेला नाही. यामुळे यंदा राज्यातील धरणासाठी देखील कमी आहे. त्यामुळे यंदा पाण्याचे नियोजन योग्य करावे लागणार आहे.
रब्बी हंगामावर होणार परिणाम
देशात यंदा सरासरी पावसाने कमी हजेरी लावली आहे. देशात पावसाची सरासरी ८६८.६ मिमी आहे. परंतु यंदा ८२० मिमीच पाऊस झाला. त्यामुळे आता कमी पाऊस झाल्यामुळे अनेक भागांत पाण्याची टंचाई जाणावणार आहे. तसंच धरणासाठा देखील कमी प्रमाणात आहे. यामुळे यंदाच्या रब्बी हंगामावर देखील पावसाचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
Published on: 20 October 2023, 10:37 IST