Weather

उद्यापासून (दि.3) विदर्भात आणि बऱ्याच ठिकाणी दुपारनंतर पावसाळी वातावरण तयार होताना दिसेल. नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, वाशीम, बुलढाण्यात पावसाची शक्यता आहे.

Updated on 02 September, 2023 6:13 PM IST

अभिषेक खेरडे, हवामान अभ्यासक

राज्यात पुन्हा एकदा पावसाळी वातावरण तयार होण्यास सुरुवात झाली आहे. मध्य पूर्व बंगालच्या उपसागरावर कमी दाब हा 3 तारखेला मध्यरात्री निर्माण होतो आहे. त्यामुळे वाऱ्यांची चक्रीय स्थिती राहील. तसेच छत्तीसगडवर चक्रकार वारे वाहतील यामुळे एकणूच उद्या (दि.4) आणि परवा (दि.5) महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस राहण्याची शक्यता आहे.

उद्यापासून (दि.3) विदर्भात आणि बऱ्याच ठिकाणी दुपारनंतर पावसाळी वातावरण तयार होताना दिसेल. नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, वाशीम, बुलढाण्यात पावसाची शक्यता आहे. मराठवाडा भागात नांदेड, हिंगोली, परभणी, बीड विजांचा गडगडाटसह तसेच जालना, संभाजीनगरचा काही भाग, धाराशिव, लातूर भागात हलक्या पावसाची शक्यता आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर पश्चिम आणि पुण्याचा बहुतांश भागात पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रमध्ये नाशिक आणि अहमदनगर, पिंपळनेरचा बरंचसा भागातील देखील पावसाचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्र मध्ये पाऊस फक्त जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

English Summary: Chance of rain for next two days See which parts of the state will receive rain
Published on: 02 September 2023, 06:13 IST