Rain Update News :
ऑगस्ट महिना संपला तरी राज्यात अपेक्षित पाऊस नाही. मात्र काही भागात हलका ते जोरदार पाऊस होत आहे. पण सर्वत्र हा पाऊस नाही. मात्र हवामान खात्याने राज्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे.
आज मराठवाड्याच्या काही भागात जोरदार पाऊस झाला आहे. या पावसाचा जोर कमी होता. तर विदर्भ आणि मराठवाड्याला हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. तर अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण होते.
मराठवाड्याच्या अनेक भागात पावसाने दडी मारली होती. पण आज पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. अचानक पावसाने हजेरी लावल्यामुळे नागरिकांची काही काळ धांदल उडाली. छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट हवामान खात्याने दिला आहे.
उद्या आणि परवा छत्रपती संभाजी नगरसह मराठवाड्यातील लातूर, बीड, उस्मानाबाद आणि नांदेड जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली असून या जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. उद्या विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
दरम्यान, हवामान खात्याने खानदेशातील जळगाव, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यात जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक आणि नगर जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी जोरदार सरी पडतील, असा अंदाज आहे.
Published on: 06 September 2023, 06:21 IST