यावर्षी मान्सूनचा प्रवास अगदी वेळेआधी सुरू झाला. त्यामुळे भारतातील केरळ मध्ये 27 मे रोजी मान्सून येण्याचा एक हवामान विभागाचा अंदाज होता. परंतु आताची परिस्थिती पाहिली तर हा अंदाज हुकणार असे दिसत आहे.
विनाअडथळा मार्गक्रमण करत असलेले मान्सून वारे मात्र गेल्या तीन दिवसापासून श्रीलंकेच्या वेशीवरच अडकले असल्यामुळे पुढच्या टप्प्यात हा प्रवास खोळंबला असून महाराष्ट्रामध्ये मान्सून दाखल होण्यासाठी जून महिन्याचा पहिला आठवडा लागेल अशी एक शक्यता वर्तवली जात आहे.
मान्सूनचा प्रवास
जर मान्सूनचा प्रवास पाहिला तर 21 मे रोजी मान्सून अरबी समुद्रात दाखल होत दक्षिणेकडून प्रवास करत मान्सून आरबी समुद्रात आणि श्रीलंका च्या किनारपट्टीपासून काही अंतरावर दाखल झाला होता. त्याच्या नियोजित वेळेआधी सहा दिवस आधीच हे वारे सक्रिय झाले होते. या सगळ्या परिस्थितीमुळे 27 मे पर्यंत मान्सून केरळ पर्यंत आणि पाच जून पर्यंत मान्सून कोकणात पोहोचण्याचा एक अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता.
तसेच सध्या बंगालच्या उपसागरात बरोबरच अरबी समुद्रातून ही जमिनीकडे बाष्पयुक्त वारे वाहत आहे. या सगळ्यापरिस्थितीमुळे महाराष्ट्रात पाच जून पर्यंत मान्सून सुरू होऊ शकतो.12 ते 15 जून दरम्यान संपूर्ण राज्यात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली होती.
परंतु सध्या मान्सूनचा विचार केला तर श्रीलंकेच्या किनारपट्टीवर मान्सून खोळंबला असल्याने पुढचा प्रवास लांबण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या सगळ्या परिस्थितीमुळे मान्सूनचे आगमन लांबले असून काही दिवस उशीर होण्याची शक्यता आहे.
यामध्ये दिलासा देणारी एक बातमी म्हणजे मान्सूनला विलंब जरी लागत असला तरी या वर्षी सकारात्मक पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
महत्वाच्या बातम्या
Published on: 24 May 2022, 11:27 IST