Weather

मान्सूनची (Mansoon) वाट पाहणाऱ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तसेच उकाड्याने हैराण झालेल्या जनतेसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी हवामान विभागाच्या हवाल्यानुसार आता समोर येत आहे. भारतीय हवामान विभागाच्या मते (Indian Meteorological Department), मान्सूनचे केरळमध्ये दणक्यात आगमन झाले आहे.

Updated on 29 May, 2022 12:49 PM IST

मान्सूनची (Mansoon) वाट पाहणाऱ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तसेच उकाड्याने हैराण झालेल्या जनतेसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी हवामान विभागाच्या हवाल्यानुसार आता समोर येत आहे. भारतीय हवामान विभागाच्या मते (Indian Meteorological Department), मान्सूनचे केरळमध्ये दणक्यात आगमन झाले आहे.

निश्चितच भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तविलेला हा अंदाज महाराष्ट्रातील जनतेसाठी तसेच शेतकऱ्यांसाठी विशेष दिलासा देणारा सिद्ध होणार आहे. दरम्यान, श्रीलंकेच्या सीमेत मान्सूनचा मुक्काम हा काही काळ वाढला होता, यामुळे मान्सूनची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांचा काळजाचा ठोकाचं चुकला होता.

 मात्र आता मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याची (Mansoon Arrived In Kerala) महत्वपूर्ण माहिती भारतीय हवामान विभागाने दिल्याने निश्चितच शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता मान्सून लवकरच महाराष्ट्राची वेश गाठणार असल्याचे सांगितले जात असून पाच जून रोजी मान्सून तळकोकणात हजेरी लावणार असल्याचे सांगितले जात आहे.

मित्रांनो खरं पाहता मान्सून हा दरवर्षी 1 जूनला केरळमध्ये दाखल होतं असतो शिवाय गतवर्षी मान्सून हा केरळ मध्ये 3 जूनला दाखल झाला होता. पण यावर्षी केरळमध्ये मान्सून लवकरच दाखल झाला असल्याने आनंद व्यक्त केला जातं आहे.

हवामान विभागाच्या मते, मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर अवघ्या सात दिवसात महाराष्ट्राचे तळकोकण गाठत असतो. तळ कोकणात दाखल झाल्यानंतर मान्सूनचे आगेकूच राजधानीकडे होते. तळकोकणातून मात्र चार दिवसात मान्सून हा मुंबई मध्ये प्रवेश करत असतो.

मित्रांनो खरं पाहता मान्सून हा दरवर्षी 11 जून च्या सुमारास मुंबई आणि पुण्यात दाखल होतो मात्र यावर्षी मान्सून हा मुंबई तसेच पुण्यात 8 जून च्या सुमारास दाखल होणार असल्याचे भारतीय हवामान विभागाकडून सांगितले गेले आहे.

यामुळे मान्सून ची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही निश्चितच दिलासादायक बातमी आहे. सध्या शेतकरी बांधव खरिपाची तयारी करत असून त्यांच्या चेहर्‍यावर भारतीय हवामान विभागाच्या या अंदाजामुळे निश्चितच समाधान बघायला मिळणार आहे.

English Summary: Breaking News: Monsoon arrived in Kerala; It will hit Maharashtra on this date
Published on: 29 May 2022, 12:49 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)